Nitin Gadkari News, Ratan Tata News  Saam Tv
मुंबई/पुणे

नितीन गडकरींनी सांगितला रतन टाटांबद्दलचा 'तो' किस्सा

देशात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध नाहीत - गडकरी

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फक्त हिंदूंसाठी नाही, मुळात संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही असं मला खुद्द रतन टाटांना (Ratan Tata) समजावून सांगावं लागलं होत. अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यात बोलताना सांगितली आहे. हे सगळ मला त्यांना औरंगाबादच्या (Aurangabad) एका हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी सांगावं लागलं होतं अस स्पष्टीकरण देखील गडकरी यांनी दिलं आहे. (Nitin Gadkari News updates)

हे देखील पहा -

नितीन गडकरी यांनी सांगितला तो किस्सा

नितीन गडकरी हे महाराष्ट्रात मंत्री असताना औरंगाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेडगेवार हॉस्पिटल चे उद्घाटन आयोजित केला होत. त्याच वेळी मुकुंदराव पणशिकर नावाचे गृहस्थ संघाचे प्रचारक होते. त्यांनी गडकरीं जवळ आग्रह धरला की या हॉस्पिटलचे उद्घाटन हे रतन टाटा यांच्या हस्ते करायच आहे. त्यांच्या सांगण्यावरून नितीन गडकरी यांनी रतन टाटा यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिलं. नितीन गडकरी यांच्या आग्रहास्त्व रतन टाटा हे स्वतः औरंगाबादला डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले. पण विमानातून उतरताच रतन टाटा यांनी नितीन गडकरी यांना ये हॉस्पिटल केवल हिंदु समाज के लिये हे क्या? असा प्रश्न विचारला.

त्यावर गडकरी यांनी तुम्हाला असं का वाटतं विचारलं असता. रतन टाटा म्हणाले की हे संघाचे हॉस्पिटल आहे म्हणून विचारलं. पण गडकरी यांनी अस नाही असं सांगत हे पूर्ण समाजसाठी असल्याचं सांगत संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही असे स्पष्टीकरण दिलं.

देशात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पाहिजे तेवढ्या सुविधा उपलब्ध नाहीत - गडकरी

त्याचबरोबर या कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देशातल्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर देखील भाष्य केले आहे. परदेशात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पाहिजे तेवढा सुविधा उपलब्ध नाहीत अशी खंत गडकरी यांनी या कार्यक्रमात बोलून दाखवली आहे.

विशेषतः ग्रामीण भागात ही परिस्थिती अतिशय बिकट आहे असं सांगत ग्रामीण भागात शिक्षणासाठी शिक्षक, शाळेची बिल्डिंग, तर कुठे विद्यार्थी नाहीत, सगळ असेल तर तिथं शिक्षण नाही अशी मिश्किल टिप्पणी देखील नितीन गडकरी यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde Birthday : साऊथमध्ये डॅशिंग व्हिलन, मराठीत हुकमी एक्का; कोट्यवधींचे मालक असूनही सयाजी शिंदेंचे पाय जमिनीवरच

NHAI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती; पगार १.७७ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नालासोप-यात मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी नेताना १० लाख ९ हजार रोख रक्कम पकडली

Alepak Recipe : हिवाळ्यासाठी खास आयुर्वेदिक आलेपाक कसा बनवावा? जाणून घ्या रेसिपी

Face Yoga Poses: डबल चिनमुळे चेहरा मोठा दिसतोय? मग घरीच करा रोज हे 5 फेस योगा प्रकार

SCROLL FOR NEXT