Nitin Gadkari Pune Chandani Chowk Twitter/@OfficeOfNG
मुंबई/पुणे

Pune Chandani Chowk: चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना दिली 'ही' डेडलाईन

Pune Chandani Chowk Traffic News: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आढावा चांदणी चौक भेट देत पूलाची पाहणी केली आहे, सोबतच वाहतुकीचा आढावाही घेतला आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक समस्येने त्रस्त झाले आहे. त्यामुळे पुणेकरांनी (Pune) थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या,वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. तसेच पुढील १५ दिवसांत परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आढावा चांदणी चौक भेट देत पूलाची पाहणी केली आहे, सोबतच वाहतुकीचा आढावाही घेतला आहे. (Nitin Gadkari Visits Chandani Chowk In Pune)

हे देखील पाहा -

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पुण्यात असून त्यांनी चांदणी चौकातील वाहतुक कोंडीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी महामार्ग आणि जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली आहे. वाहतूकीसाठी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता चांदणी चौक परिसरातील काम जून २०२३ पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पुणे शहरातून अनेक शहरात जाणाऱ्या मार्गात कोणते बदल केले जाणार हे स्पष्ट केलं आहे, टाउन प्लॅनींगनुसार या सगळ्या मार्गाची रचना होणार आहे. पुणे-शिरुर नगर- औरंगाबाद रस्त्यात तीन मजली उड्डाणपुल होणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

पुढे ते म्हणाले की, चांदणी चौकातील पूल येत्या दोन-तीन दिवसात पाडणार आहे, त्यासाठी नवं कामदेखील लवकर सुरु करणार आहे. हे लवकर काम झाल्यास येत्या जूनमध्ये नव्या पुलाचं उद्घाटन करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन जमिनीपासून १०० फूट उंचीवरुन उडणाऱ्या बसेसची योजना जाहीर केली. त्यासाठी निधी देण्याचंही स्पष्ट केलं. लोकप्रतिनिधींचा सहभाग यासाठी जास्त महत्वाचं असेल असंही यावेळी नितीन गडकरी म्हणाले आहेत.

त्याचप्रमाणे पुण्यात इलेक्ट्रीक डबलडेकर बस सुरु करण्याचा विचार आहे, असं देखील ते म्हणाले. नॅशनल हायवेच्या बाजूला जागा दिली तर त्या ठिकाणी लॉजीस्टीक पार्क बांधण्याच्या तयारीत आहोत, त्यासाठी २ लाख कोटींचे लॉजीस्टीक पार्कसाठी खर्च करणार असल्याचं देखील त्यांनी संगितलं.

यावेळी नितीन गडकरी यांनी चाकण एमआयडीसी पासून २७ किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे १८० हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. पुणे शहराभोवती होणारा अभिर्भाव लक्षात घेता चाकण एमआयडीसीपासून २७ किमी अंतरावर असणाऱ्या पावलेवाडी येथे १८० हेक्टरममध्ये हे लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT