कल्याण ग्रामीण भागात दारू माफियांचे 9 लाखांचे नवसागर मिश्रित रसायन नष्ट
कल्याण ग्रामीण भागात दारू माफियांचे 9 लाखांचे नवसागर मिश्रित रसायन नष्ट Saam TV
मुंबई/पुणे

कल्याण ग्रामीण भागात दारू माफियांचे 9 लाखांचे नवसागर मिश्रित रसायन नष्ट

प्रदीप भणगे

कल्याण : द्वारली आणि माणेरे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वात मोठी कारवाई केली आहे. नवसागर मिश्रित तब्बल ४ हजार ५०० लिटर रसायन राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केलं असून ९ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हा नष्ट करण्यात आला आहे. कल्याण (Kalyan) ग्रामीण मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या हातभट्या आहेत, त्यामुळे या हातभट्ट्या शोधण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर उभे ठाकले होते. (Latest Kalyan Dombivali News In Marathi)

दरम्यान कल्याण आणि अंबरनाथ राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) ग्रामीण परिसरात कारवाईला सुरुवात केली. याचवेळी गुप्त माहितीद्वारा तर्फे त्यांना ग्रामीण भागातील  द्वारली, माणेरे गावच्या शिवारात नवसागर मिश्रित रसायनाने दारू तयार करत असल्याचे समजले आणि त्यांनी घटनास्थळी धाड टाकली नवसागर मिश्रित रसायनाने भरलेले ड्रम उध्वस्त केले आहेत.

यात तब्बल ४ हजार ५०० लिटर रसायन राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केलं असून ९ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हा नष्ट करण्यात आला आहे, ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंबरनाथ विभागीय पोलीस निरीक्षक एस.एन. घुले, उप निरीक्षक कल्याण अंबरनाथ विभाग मालवे, दुय्यम निरीक्षक आर.आर.चोरट, जवान प्रमोद यशवंतराव, आर.एम.राठोड, कुणाल तडवी आणि सदानंद जाधव यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Health News: एक दिवसाच्या ब्रेकनंतर शरद पवार पुन्हा एकदा झंजावाती दौऱ्यासाठी सज्ज! मोठी Update समोर

Benifits of Ghee: जेवणामध्ये एक चमचा तूप; शरीराला आरोग्याचे वरदान

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी दिघेंना ठाणे जिल्ह्याचं अध्यक्षपद सोडायला भाग पाडलं, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

SCROLL FOR NEXT