Maharastra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharastra Politics : निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? VIDEO

nilesh rane political news : निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि नारायण राणे यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचं सुपुत्र माजी खासदार निलेश राणे हे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्षांनी जोरदार सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबीयांनी दावा केला आहे. तर महायुतीतील जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून कुडाळ-मालवणचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत निलेश राणेंच्या प्रवेशासंदर्भात चर्चा झाली. त्यावर पक्ष प्रवेशाचा हा तोडगा निघाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. निलेश राणे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

माजी खासदार निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. यामुळे या मतदारसंघाबाबत नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. राजकीय चर्चांनंतर आता निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

निलेश राणे यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

निलेश राणे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेवर उदय सामंत म्हणाले, 'निलेश राणे हे कोकणातले लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणारा एक चांगला युवा नेता आहे. - त्यांच्याबाबत आज नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. फक्त निलेश राणे विधानसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत, इतकंच मला माहीत आहे. याबाबतीत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.

'निलेश राणे यांनी निर्णय घेतल्यास महायुतीची संपूर्ण ताकद आपण त्यांच्या मागे उभी करू. पक्ष प्रवेशाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी घ्यायचा आहे. निलेश राणे यांनी निर्णय घेतला तर आमची कोकणातील शिवसेनेची ताकद पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल,असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT