Maharashtra Politics : एकनाथ शिंदे - अजितदादांमध्ये मध्यरात्री बैठक? पहा व्हिडिओ

Eknath Shinde - Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात मध्यरात्री झालेल्या बैठकीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने या बैठकीत झालेले निर्णय महत्वाचे ठरणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यात बुधवारी मध्यरात्री बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या या दोन्ही पक्षांमध्ये नेमकं काय खलबत सुरू आहे यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह दादा भुसे, प्रफुल्ल पटेल आणि उदय सामंत हे देखील उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीवर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी विधानसभेत अजित दादांना महायुतीतच राहण्याचं आवाहन करण्यात आलं असल्याची देखील शक्यता आहे. याशिवाय काही वेगळा विचार या बैठकीत झाला असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राज्यभरात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकित सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. त्याच बरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसार आणि प्रचार यासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला अहवालावरही उपस्थित नेत्यांमध्ये सविस्तरचर्चा करण्यात आल्याची सूत्रांची महिती आहे. दरम्यान, काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे या बैठकीत काय ठरत आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com