Nilesh Rane Saam Tv
मुंबई/पुणे

मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं PUC आणि इन्शुरन्स संपला, राणेंनी थेट पुरावेच दाखवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वापरत असलेल्या कारची पीयूसी मुदत आणि वीमा मुदतही संपली असल्याचं ट्विट भाजप नेते निलेश राणे यांनी केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) वापरत असलेल्या कारची पीयूसी मुदत आणि वीमा मुदतही संपली असल्याचं ट्विट भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नं चिन्हं निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मर्सिडिस कारने वर्षा बंगला ते विधान भवन येण्या जाण्यासाठी वापरत आहेत. हीच कार ते गेले काही वर्षे वापरत आहेत. पण या कारची पीयूसी मुदत १६ जून २०२१ ला संपल्याचं आणि वीमा मुदत संपल्याचं समोर येताच या कारशी संबधीत सर्व कागदपत्रे ही क्लीअर नाहीत, या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाला काहीच कल्पना नसावी याचं आश्चर्य व्यक्तं केलं जातं आहे.

ट्विट करत राणे म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कालबाह्य प्रदूषण प्रमाणपत्र आणि कालबाह्य विमा पॉलिसी असलेल्या कारमध्ये प्रवास करतात. जर तोच माणूस राज्य चालवत असेल तर येथे गोष्टी कशा हाताळल्या जातात याची कल्पना करू शकता.

मुख्यमंत्री कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १५० कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी एकाही जबाबदार व्यक्तीला मुख्यमंत्र्यांच्या कारची कागदपत्र अपुर्ण असल्याची कल्पना नाही. त्याचा फायदा घेत भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री वापरत असलेली कार कशी अपुर्ण कागदपत्र असलेली आहे, हे उघड केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नं चिन्हं उभं राहीलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT