Nilesh Ghaywal Saam Tv
मुंबई/पुणे

निलेश घायवळचा नवा प्रताप! त्याच्या अन् बायकोच्या नावे ४ मतदान ओळखपत्र, एक पुण्यात तर दुसरे नगरमध्ये; नावात बदल करत...

Nilesh Ghaywal: कोथरूड गोळीबार अन् मारहाण प्रकरणातील आरोपी निलेश घायवळचा आणखी एक नवा प्रताप समोर आला आहे. निलेश आणि त्याच्या बायकोचे एक नाही दोन मतदारसंघात ४ मतदार ओळखपत्र असल्याचे उघड झाले आहे.

Priya More

Summary -

  • निलेश घायवळ आणि त्याच्या पत्नीच्या नावाने ४ मतदान ओळखपत्र आढळले.

  • दुहेरी नोंदणी पुणे आणि अहमदनगर या दोन शहरांत झाली होती.

  • पोलिसांनी घायवळच्या १० बँक खाती गोठवली आहेत. ज्यात ३८ लाख रुपये आहेत.

  • लुक आऊट नोटीस जारी केल्यानंतर निलेश घायवळ लंडनला पळाला.

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील गुंड निलेश घायवळ याचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. निलेश घायवळ आणि त्याची पत्नी यांच्या नावाने २ वेगवेगळ्या शहरातून मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. नावामध्ये अंशतः बदल करून घायवळने आणि त्याच्या पत्नीच्या नावाने २ शहरात २ म्हणजे एकूण ४ मतदान ओळख पत्र आहेत. यातील एक पुणे आणि दुसरे अहिल्यानगर येथील असल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे.

बनावट नोंदी आणि नावात फेरफार करून खोटे वय दाखवत हे ओळखपत्र काढून देण्यासाठी निलेश घायवळ आणि त्याच्या बायकोला कुणी मदत केली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोथरूडमध्ये गोळीबार आणि मारहाण प्रकरणामुळे निलेश घायवळ पुन्हा चर्चेत आला. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पण निलेश घायवळ फरार झाला असून तो लंडनला पळून गेला असल्याचे सांगितले जात आहे. निलेश घायवळच्या अटकेसाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

निलेश घायवळने कसे केले फेरफार?

पती- निलेश बन्सीलाल गायवळ

ओळखपत्र क्र. DRD1360288 – कोथरूड, पुणे (वय 47)

TKM8217994 – कर्जत-जामखेड, अहमदनगर (वय 48)

पत्नी: स्वाती निलेश गइवाल

ओळखपत्र क्र. SAO7387947 – कोथरूड, पुणे (वय 42)

TKM8218026 – कर्जत-जामखेड, अहमदनगर (वय 33)

मतदान ओळखपत्रात उघडकीस आलेल्या विसंगती -

दुहेरी नोंदणी - पुणे व अहमदनगर (~150 किमी अंतर)

कर्जत मतदारसंघात सलग क्रमांक (297 आणि 298) → एकत्र नोंदणी?

पतीच्या नावात खेळ: निलेशकुमार गायवळ विरुद्ध निलेश गायवळ

दरम्यान, पुणे पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ आणि त्याच्या संबंधित व्यक्तींचे बँक खाते आता पुणे पोलिसांनी गोठवले आहेत. पुणे पोलिसांनी निलेशच्या अटकेसाठी लुक आऊट नोटीस जारी केली. ही नोटीस जारी केल्यानंतर घायवळविरोधात पोलिसांकडून आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. निलेश घायवळसह त्याच्या कुटुंबीयांची एकूण १० बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या १० खात्यांमध्ये ३८ लाख रुपये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT