Fugitive gangster Nilesh Ghaywal’s London escape triggers passport controversy and political storm. saam tv
मुंबई/पुणे

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Ravindra Dhangekar : फरार गुंड नीलेश घायवळ लंडनला पळून गेलाय. त्याला पासपोर्ट कोणी दिला यावरून वाद निर्माण झालाय. या प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्या मौनामुळे धंगेकरांनी वेगळाच संशय व्यक्त केलाय.

Bharat Jadhav

  • कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेला.

  • त्याला पासपोर्ट कसा मिळाला यावरून मोठा वाद सुरु आहे.

  • चंद्रकांत पाटील यांच्या चुप्पीवरून विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे.

पोलीस यंत्रणेला चुना लावून कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेलाय. या घायवळच्या पलायन प्रकरणावरुन महायुतीमध्ये अंतर्गत कलह पेटण्याची शक्यता आहे. निलेश घायवळ याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असूनही त्याला पासपोर्ट कसा आणि कोणी दिला, यावरुन जोरदार चर्चा रंगलीय. काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभागामुळे पासपोर्ट मिळाल्याची संशय व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावरून चंद्रकांत पाटील चुप्पी साधून असल्यानं शिवसेना नेत्यानं वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील हे निलेश घायवळ प्रकरणात काहीच का बोलत नाहीत, असा सवाल रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केलाय. एका मराठी वृत्तसंस्थेशी बोलताना धंगेकरांनी हा सवाल उपस्थित केलाय. घायवळ प्रकरणावर चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत, ते गप्प का? ते या प्रकरणात लक्ष का घालत नाहीत? असे प्रश्न शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी उपस्थित केलेत. निलेश घायवळवर राजकीय वरदहस्त आहे.

त्याशिवाय त्याला पासपोर्ट कसा मिळू शकतो? कसून पोलीस चौकशी व्हायला हवी. मग घायवळला कोण मदत करत आहे, हे समोर येईल. मी आता सत्तेत असलो तरी खोट्याला खोटं म्हणणारा असल्याचं धंगेकर म्हणालेत.

निलेश घायवळवर हत्या, अपहरण, खंडणी, अवैधरित्या शस्त्रांचा वापर अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचमुळे घायवळ याने पासपोर्टसाठी अर्ज करताना आपल्या नावाचे इंग्रजी स्पेलिंग 'घायवळ' ऐवजी 'गायवळ' असे करुन घेतलं. मात्र, तरीही इतके गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला, हा प्रश्न कायम राहतो, असं धंगेकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्नडला टोमॅटो दोन रुपये किलो व्यापाऱ्यांकडून लूट

Heart Disease: कमी झोपेमुळे तुम्हीच देताय हार्ट अटॅकला आमंत्रण, ह्रदयाचे आणि झोपेचे नाते काय? जाणून घ्या

शरद पवार गटाला धक्का; २ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT