Shivsena Saam
मुंबई/पुणे

Shivsena: शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या वाहनावर गोळीबार; मध्यरात्री दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडून पसार

Shiv Sena Leaders Car Fired: शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना वारजे माळवडी परिसरात रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निलेश घारे हे गणपती माथा येथील जनसंपर्क कार्यालयात सहकाऱ्यांसह उपस्थित होते. त्याचवेळी, बाहेर पार्क केलेल्या काळ्या रंगाच्या गाडीवर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी धाडधाड गोळी झाडली. नंतर तेथून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, फॉरेन्सिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू आहे. गोळी नेमकी कुणी आणि का झाडली? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विविध पक्षांच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पोलिस प्रशासनाने जलद कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कामात बढतीचे योग अन् हातात पैसा, वाचा रविवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update : शिवसेनेची कोल्हापुरात बाईक रॅली

राजकारण तापलं; वंचितच्या रॅलीवर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न, सुजात आंबेडकरांचा गंभीर आरोप, VIDEO

Aawaj Maharashtracha Nagpur: 'पदवी आहे, पण नोकरी नाही'; नागपूरच्या तरुणांचा राजकारण्यांना सवाल

ग्रीनलँडमध्ये “I Love You” कसं म्हणतात? शब्द वाचून व्हाल चकीत

SCROLL FOR NEXT