Vaishnavi Hagawane Case x
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane Death Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Vaishnavi Hagawane case Nilesh Chavan Arrested : वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर कोर्टाने निलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Namdeo Kumbhar

Nilesh Chavan Police Custody : वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याला शिवाजीनगर कोर्टने तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निलेश चव्हाण याच्यावर बावधान आणि वारजे कोर्टात गुन्हा दाखल आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे. निलेश चव्हाण मागील दहा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तीन राज्यातून प्रवास करत निलेश चव्हाण नेपाळला पोहचला होता. पिपंरी चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून शुक्रवारी बेड्या ठोकल्या. आज पहाटे निलेश चव्हाण याला पुण्यात आणलं. मेडिकल चाचणी केल्यानंतर निलेश चव्हाण याला पोलिसांनी कोर्टात हजर केले. सरकारी वकिलांनी निलेश चव्हाण याची कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवाद झाल्यानंतर निलेश चव्हाण याला कोर्टाने तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वैष्णवी हगवणे यांच्या मृत्युपूर्वी आरोपी यांच्यापैकी एक आणि निलेश चव्हाण यांचा कॉल झाला होता, त्याचा तपास करायचा आहे असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. निलेश चव्हाण याच्या वकिलांकडून जोरदार प्रतिवाद करण्यात आला. फक्त बाळ त्याच्याकडे होत म्हणून या प्रकरणात नाव घेण्यात आलं आहे, असा युक्तीवाद वकिलांकडून करण्यात आला. पण कोर्टाने निलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी सुणावली आहे.

सरकारी वकिलाने काय युक्तीवाद केला?

करिष्मा हगवणे हिच्यासोबत मिळून निलेश चव्हाणने वैष्णवी हगवणे यांना त्रास दिला आहे, याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. निलेश चव्हाण याने मोबाईल डेटा डिलिट केलाय, तो रिकव्हर करायचा आहे. करिष्मा आणि शशांक हगवणेचा मोबाईल याच्याकडेच आहे, ते देखील सापडले नाहीत. त्याच्याकडून ते मोबाइल जप्त करायचे आहेत. निलेश चव्हाण याच्यावर वेगवेगळे गुन्हे आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण याचा सहभाग आहे का? याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपी निलेश चव्हाण याला पाच दिवसांची पोलीस कोठडी द्यावी.

निलेश चव्हाणच्या वकिलाने काय युक्तवाद केला

फक्त बाळ त्याच्याकडे होतं म्हणून या प्रकरणात नाव घेण्यात आलं आहे. त्यानंतर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निलेश चव्हाण याच्याकडे शस्त्राचा परवाना आहे पण त्यानं शस्त्र कुठेच वापरले नाही. हे गुन्हे का दाखल करण्यात आले? ही सगळी थेअरी आहे. व्यक्ती धरायचा आणि मग त्याच्याविरोधात पुरावे गोळा करायचे असा प्रकार सुरू आहे. निलेश चव्हाण याच्यावरील सर्व दाखल गुन्हे जामीपात्र आहे. पोलीस कोठडी देऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT