मुंबई : एनआयएने देशातील दोन राज्यात धाडी टाकल्या. एनआयएने हेरगिरी केल्याच्या संशयातून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये धाडी टाकत संशयितांच्या घरांची शोध मोहीम सुरु केली आहे. या धाडीनंतर एनआयएने तिघांना ताब्यात घेत अटक केल्याची माहिती मिळत आहे.
२०२१ साली विशाखापट्टणमच्या नौदलाच्या तळाची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी एनआयएने कारवाईला सुरुवात केली आहे. नौदलाच्या तळाची हेरगिरी करण्यासाठी संशयितांना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयने पैसे दिल्याचा एनआयएला संशय आहे.
एनआयएने तिघांकडून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि मोबाईल जप्त केले आहेत. तसेच एनआयने आज तिघांना अटक केली आहे. या मोठ्या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एनआयने गुजरातमधून पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या संशयातून एका अटक केली होती. प्रवीण मिश्रा असे या संशयिताचे नाव होते. प्रवीण मूळचा बिहारचा होता. लष्करी गुप्तचारांकडून माहिती मिळाल्यानंतर प्रवीणला अटक करण्यात आली होती. प्रवीण सोशल मीडियावरून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला माहिती पुरवत असल्याच्या त्याच्यावर संशय होता.
तसेच काही महिन्यांपूर्वी मुंबईतील कुर्ला या भागातही एनआयएने कारवाई केली होती. एनआयएने कुर्ल्यातील अमान सलिम शेखला अटक केली होती. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करण्याच्या संशयातून त्याला अटक केली होती. शेखच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संघटनाने भारतीय नौदलातील कर्मचाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लान आखला होता, अशी माहिती एनआयएच्या आरोपपत्रातून समोर आली. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.