Raigad Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: ८ दिवसांपूर्वी लग्न, नवं दाम्पत्य गावाकडे निघाले; पण वाटेतच अक्रीत घडलं, सुजतासमोरच महेशचा मृत्यू

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. नवविवाहित दाम्पत्य गावाकडे जात होते. वाटतेच सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिली. बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याने प्राण सोडले.

Priya More

Summary -

  • मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

  • नवदाम्पत्य दुचाकीवरून गावाकडे जात होते

  • दुचाकीला सिमेंट मिक्सर ट्रकने धडक दिली

  • अपघातामध्ये नवऱ्याने बायकोच्या डोळ्यासमोर प्राण सोडले

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली होती. पनवेल येते राहणारा ३४ वर्षीय तरुण आपल्या बायकोला घेऊन गावाकडे जात होता. त्याचवेळी नागोठणेकडे जाणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बायकोच्या डोळ्यासमोर नवऱ्याचा मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना बुधवारी सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली होती. पनवेल येथे राहणाऱ्या महेश जाधवचे ८ दिवसांपूर्वी सुजातासोबत लग्न झाले होते. ते दोघे पनवेल येथे राहत होते. लग्नानंतर ते दुचाकीने माणगाव तालुक्यातील पन्हाळघर गावामध्ये जात होते त्यावेळी वाटेमध्ये हा भयंकर अपघात झाला. नागोठणे येथील सिमेंट प्लांटकडे जाणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकी पुलावर २० मीटरपर्यंत घसरत गेली.

या अपघातामध्ये महेश आणि सुजाता दोघेजण गंभीर जखमी झाले होते. जखमी झालेल्या महेशने जागीच प्राण सोडले. सुजाताच्या डोळ्यासमोरच नवऱ्याचा मृत्यू झाला. महेश पनवेलमध्ये राहत होता आणि तो टेम्पो चालक म्हणून काम करत होता. या अपघातानंतर वडखळ पोलिसांनी आरोपी चालक दिलचंद कुमार चौहान (२३ वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

तर अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुजातावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. या घटनेमुळे पन्हाळघर गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच महेशचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हर्षवर्धन सदगीरची कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती, सरकारविरोधात व्यक्त केली नाराजी

Monday Horoscope: शांत डोक्याने महत्वाची कामे पूर्ण कराल, ५ राशींना मिळणार नव्या संधी; वाचा आजचे राशीभविष्य

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

SCROLL FOR NEXT