NEWBORN BABY GIRL FOUND DEAD IN PUNE RIVER KHARADI SHOCKING INCIDENT saam tv
मुंबई/पुणे

माणुसकी वेशीवर टांगली! नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह, पुण्यातील संतापजनक घटना

Newborn Baby Girl Body Found In Mula Mutha River Pune: पुण्यातील खराडी परिसरात मुळा-मुठा नदीपात्रात नवजात चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जन्मानंतर बाळाला नदीत फेकल्याचा संशय असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यात खराडी परिसरातील मुळा-मुठा नदीपात्रात शुक्रवारी दुपारी एका नवजात चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याची संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जन्मानंतर लगेचच अज्ञात व्यक्तीने या बाळाला नदीत फेकून दिल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी खराडीजवळील नदीपात्रात एक नवजात बाळ तरंगताना काही नागरिकांना दिसले. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. नदीत मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 'शहीद भगतसिंग जीवन रक्षक फाउंडेशन'चे जीवरक्षक बच्चूसिंग टाक यांनी बोटीच्या साहाय्याने नदीत उतरून या बाळाचा मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक तपासात हे मृत अर्भक स्त्री जातीचे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे.

या चिमुकलीला नदीत कोणी फेकले आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी वाघोली पोलीस परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत असून, स्थानिक पातळीवर तसेच रुग्णालयांमध्ये गुप्त माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या अमानुष कृत्यामुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: माजी मंत्र्यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात, शिक्षक मंतदार संघ निवडणुकीत मोठी अपडेट

माजी पंतप्रधानांच्या बहिणीला अटक; राजकारणात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: गोवळकोटमध्ये गणेश विसर्जनाच्या दोन अनोख्या परंपरा

Floral Print Saree Designs: ऑफिसपासून लग्नसराईपर्यंत! ट्राय करा 'या' ७ सुंदर आणि हलक्या फ्लोरल साड्या

प्रसिद्ध न्यूरोसर्जनचे अपघाती निधन; महामार्गावर कारचा कोळसा

SCROLL FOR NEXT