Mumbai Traffic Police Collect 89 lakhs Mid day
मुंबई/पुणे

New Year 2025: विना हेल्मेट, सिग्नल तोडणं, नो एण्ट्रीत प्रवेश; बेशिस्त वाहन चालकांवर बेधडक कारवाई; ८९ लाखांचा दंड वसूल

Mumbai Traffic Police Collect 89 lakhs : नवीन वर्षाचं स्वागत करताना बेशिस्त वाहन चालवणाऱ्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केलाय.

Bharat Jadhav

नवीन वर्षाचं स्वागत करताना नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना वाहन चालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलीय. नववर्षाचं स्वागत करताना बेशिस्त वाहन चालणाऱ्यांविरोधात मुंबईत पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केलाय. पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७, ८०० वाहन चालकांकडून ८९ लाख १९ हजारांचा दंड वसूल केलाय. ३१ डिसेंबरच्या रात्री अपघात टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहीमेच्या अंतर्गत पोलिसांनी लाखो रुपयांचा दंड वसूल केला. वर्ष २०२४ ला निरोप देण्यासाठी आणि २०२५ च्या स्वागतासाठी मुंबईतील विविध पब, डिस्को आणि क्लबमध्ये सेलिब्रेशन करण्यात आलं. भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. लोकांनी फटाके फोडत आणि चवदार मेजवानी करत २०२४ ला निरोप देत २०२५ चं स्वागत केलं. मात्र यावेळी अनेक वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम मोडल्याचं दिसून आलं.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. मुंबई पोलिसांनी बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करत ८९ लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. पोलिसांनी १७,८०० बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. तसेच ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या १५३ तळीरामांवर देखील पोलिसांनी कारवाई केलीय.

अंधेरी पश्चिम भागात असलेल्या कंट्री क्लबमध्ये देखील फिल्मी कलाकारांच्या उपस्थितीत सरत्या वर्षाला निरोप दिला. नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. नववर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. जुहू चौपाटीवर सर्वाधिक पर्यटक हे नववर्ष स्वागत करण्यासाठी जमा झाले होते.

या ठिकाणी पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चौपाटीच्या प्रत्येक एन्ट्री पॉइंटवर तसेच रस्त्यावर आणि चौपाटीवर देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. मंगळवारच्या संध्याकाळपासूनच गिरगाव, दादर, जुहू या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी होण्यास सुरुवात झाली होती.

गेट वे ऑफ इंडिया परिसरातही नववर्षाच्या स्वागताचा उत्साह होता. शहरातील ठिकठिकाणची हॉटेल्स, रेस्तराँ, पब यांनी खास पार्ट्यांचे आयोजन केले होते. शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरा भाईंदर विरारमध्ये २५ डिसेंबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या आठवडाभराच्या विशेष मोहिमेत मद्यपान करून वाहन चालविण्याच्या एकूण ८३ प्रकरणांची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT