मुंबईत नवे निर्बंध लागू; संध्याकाळी 5 नंतर समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईत नवे निर्बंध लागू; संध्याकाळी 5 नंतर समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी

सध्या कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. 31 डिसेंबर आणि नव वर्षाचे स्वागत करणाऱ्यांसाठी ही बातमी अतीशय महत्वाची आहे. मुंबईत आता समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी 5 नंतर फिरणाऱ्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबईकरांने तुम्ही जर समुद्र किनारी फिरण्याचा विचार करत असाल तर तो रद्द करा आणि घरीच 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करा. कारण संध्याकाळी 5 नंतर घराबाहेर पडण्यास मनाई आहे.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नागरिकांना संध्याकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत समुद्रकिनारे, मोकळी मैदाने, समुद्राचे दर्शनी भाग, विहार, उद्याने, किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. हा आदेश 15 जानेवारीपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

सध्या कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढला आहे. त्यामुळे काही निर्बंध असताना लोक अजूनही कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाही. आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी केली आहे. उद्यापासून मुंबईत नवी नियमावली लागू होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT