New Railway Station in Western Line Saam Tv
मुंबई/पुणे

New Railway Station: पश्चिम रेल्वेला मिळणार आणखी एक स्टेशन! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

New Railway Station in Nalasopara Western Line: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा परिसरात आणखी एक रेल्वे स्टेशन बांधणार आहे.

Siddhi Hande

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

नालासोपारा येथे नवीन स्टेशन बांधणार

प्रवाशांना होणार फायदा

New Railway Station in Western Line: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आता पश्चिम रेल्वे मार्गावर आणखी एक स्टेशन बांधण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा येथे नवीन स्टेशन बांधण्यात येणार आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. त्यामुळे नालासोपाऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना फायदा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची घोषणा (Devendra Fadnavis Annoucement)

गेल्या अनेक दिवसांपासून नालासोपारा शहर चर्चेत आले आहे. याच स्थानकासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नालासोपाऱ्यात झालेल्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली आहे. नालासोपाऱ्याच्या विकासासाठी अनेक घोषणा केल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून नालासोपाऱ्यात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत मताधिक्य मिळाले होते. याच गोष्टी लक्षात घेऊन नालासोपाऱ्यात अनेक विकास प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नालासोपारा स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी अलकापुरी हे नवे स्थानक तयार केले जाणार आहे.

नालासोपारा येथे नवीन स्टेशन बांधणार

वसई आणि विरारमध्ये ५ किलोमीटरच्या अंतरावर नालासोपारा स्थानक असल्याने नागरिकांन प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. याच गर्दीपासून प्रवाशांची मुक्तता व्हावी म्हणून हे नवीन स्थानक बांधण्यात येत आहे. आता अडीच अडीच किलोमीटर स्थानकावर रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे. याची सुरुवात नालासोपाऱ्यातील अलकापुरी स्थानकापासून होणार आहे.

नवीन लोकल

मुख्यमंत्र्यांनी अजून एक घोषणा केली आहे. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत विविध रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये विविध सोयीसुविधा असणार आहे. नवीन स्वयंचलित दरवाजे असणाऱ्या आणि एसी डबे असणाऱ्या लोकल सुरु करण्याचा प्रकल्प आहे. या नवीन लोकलचे दर सध्याच्या द्वितीय श्रेणीच्या तिकीट दराएवढे असणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! बायकोचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध उघड; संतापलेल्या नवऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्येच पत्नीची गोळ्या झाडून हत्या

India Travel : जगातील ५ सर्वात स्वस्त टूरिस्ट प्लेसेस, आयुष्यात एकदा तरी या ठिकणाला भेट द्या

Maharashtra Live News Update : जळगावात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

Adhik Maas 2026: हिंदू नववर्ष 2083 मध्ये 12 नव्हे तर असणार 13 महिने; जाणून घ्या यागामचं धार्मिक कारण

Makar Sankranti 2026: तब्बल १९ वर्षांनंतर होणार चमत्कार; 'या' ३ राशींचं नशीब संक्रांतीला उजळणार

SCROLL FOR NEXT