कल्याण पश्चिमेतील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नवी आयडिया! प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याण पश्चिमेतील वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नवी आयडिया!

कल्याण पश्चिमेतील शहरातील वाहतुकीवरचा पडणारा प्रचंड ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण पश्चिमेतील शहरातील वाहतुकीवरचा पडणारा प्रचंड ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे. संध्याकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत खासगी बसेच्या मार्गात बदल केला आहे. कल्याण स्टेशन परिसरासह मुख्य चौकात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची घुसमट होत आहे. ही वाहतूककोंडी हटवताना पोलिसांची दमछाक होते. त्यातच पालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम स्टेशन परिसरात सुरू झाल्यामुळे या वाहतूककोंडीत भर पडली होती. (New idea of ​​traffic police to avoid traffic congestion in Kalyan West)

हे देखील पहा -

ही कोंडी फोडण्यासाठी पालिकेच्या सहकार्याने वाहतूक पोलिसांनी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, पडघा व इतर ठिकाणांहून येणाऱ्या खासगी प्रवासी बसेसचा मार्ग बदलला आहे. मात्र कल्याण शहरातील मुख्य चौकात आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत खासगी बसेसना वेळ आणि शहरातील कमी वर्दळीच्या ठिकाणी थांबे निश्चित करण्यात आले आहेत.

अशी असेल पर्यायी व्यवस्था

खासगी बसेसची दुर्गाडी, लालचौकी, रेस्टहाऊस, सिने हॉल याठिकाणी मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. मात्र या सर्व बसेसना लालचौकीपासून सिनेहॉलपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामुळे भिवंडीकडून येणाऱ्या वाहनांना गोविंदवाडी बायपास मार्गे कल्याण पत्रीपूल एपीएमसीकडून सिनेहॉलपर्यंत जाऊन तिथूनच माघारी जावे लागेल. तर पडघ्याकडून येणाऱ्या वाहनांना आधारवाडी चौक, दुर्गाडी मार्गे गोविंदवाडी बायपासवरून सिनेहॉलपर्यंत येऊन प्रवाशांना उतरवावे आणि तिथून परत जावे लागेल. तर विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या बसेसना गोविंदवाडी बायपास पत्रीपूल, चक्कीनाका श्रीराम चौकातून इच्छित स्थळी आणि उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथकडे जाणाऱ्या बसेसनी बिर्ला कॉलेजमार्गे शहाड पुलावरून यू टर्न घेऊन चोपडा कोर्टमार्गे इच्छित स्थळी मार्गस्थ व्हावे अशी माहिती ट्रॅफिक पोलिसांनी दिली आहे.

डोंबिवलीतील वाहतूक कोंडी कधी कमी होणार?

कल्याण प्रमाणेच डोंबिवली शहरातही येणाऱ्या खासगी बसेसची संख्या जास्त आहे. या बसेसमुळे मानपाडा रोड, फडके रोड, टिळक रोड आणि पूर्वेतील स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. काही वर्षांपूर्वी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या बसेसना घरडा सर्कल येथे थांबा देण्यात आला होता. सध्या या निर्णयाला केराची टोपली दाखविली जात असून खासगी बस सायंकाळी स्टेशन परिसरात घुसतात. याकडे ट्रॅफिक पोलिस का दुर्लक्ष करत आहेत असा सवाल उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे कल्याण नंतर डोंबिवलीत हा प्रयोग कधी राबविला जाणार का हे पाहावे लागेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT