New Expressway Link Badlapur, Dombivli To Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

New Expressway : बदलापूर, कल्याण, डोंंबिवलीला थेट मुंबईशी जोडणारा एक्स्प्रेस वे; कसा असेल हा प्रकल्प? वाचा सविस्तर

New Expressway Link Badlapur, Dombivli To Mumbai : एमएमआरडीएने नव्या एक्स्प्रेस वे प्रकल्पाच्या नियोजनाची सुरुवात केली आहे. या महामार्गामुळे कल्याण, बदलापूर आणि त्या पलिकडच्या नागरिकांना थेट मुंबई, नवी मुंबई गाठता येणार आहे.

Yash Shirke

Expressway News : एमएमआरडीएने नवीन एक्स्प्रेस वेसाठी मार्गाचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. या नव्या महामार्गामुळे मुंबई, नवी मुंबई परिसरात वाहतूक अधिक सुरळीतपणे होईल असा विश्वास एमएमआरडीएला आहे. तब्बल ६,००० चौरस किमी क्षेत्रफळावर या प्रकल्पाचे काम सुरु केले जाणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १२ मेट्रो मार्ग, दोन सागरी पूल, तीन महामार्गांना जोडला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

डोबिंवली, कल्याण, बदलापूर अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना मुंबई, नवी मुंबईला बाय-रोड जाण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. या नव्या एक्स्प्रेस वेमुळे नागरिकांना मुंबई आणि नवी मुंबईला जाण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध होईल. एमएमआरडीएने हा महामार्ग प्रवाशांचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या नव्या एक्स्प्रेस वेससाठी निविदा मागवल्या आहेत. नियुक्त केलेल्या कंत्राटदारांवर महामार्गासाठी सर्वेक्षण करुन भूसंपादन करणे, त्यानंतर संपूर्ण बांधकाम करणे अशी जबाबदारी असेल. कंत्राट दिल्यानंतर सात ते आठ महिन्यांच्या आत प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक असल्याचे एमएमआरडीच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

नवीन एक्स्प्रेस वे हा राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाच्या मानकांनुसार तयार केला जाणार असे म्हटले जात आहे. डीपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) तयार करणारा कंत्राटदार या नव्या महामार्गाची अंतिम रुंदी निश्चित करेल असेही एमएमआरडीएने म्हटले आहे. येत्या काही महिन्यात हा प्रकल्प सुरु होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT