BJP Vs NCP Saam TV
मुंबई/पुणे

मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा; राष्ट्रवादीचा आक्षेप, भाजपने लावलेल्या बॅनरमुळे नवा वाद

'पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे.'

गोपाल मोटघरे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे १४ जून रोजी प्रथमच देहू नगरीत येणार असून पंतप्रधानांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू (Dehu) संस्थान प्रशासन जोरदार तयारी करत असताच भाजपने देखील मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु केली आहे. मात्र, स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

कारण, भाजपकडून मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरती विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो हा मोठा लावण्यात आल्यामुळे तो विठ्ठल भक्तांचा आणि वारकरी सांप्रदायाचा अपमान असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून (NCP) करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विट (Tweet) करत या बॅनरवरती आक्षेप घेतला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, 'संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने (BJP) जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे.' असं ट्विट करत त्यांनी या फोटोवर आक्षेप घेतला आहे.

शिवाय हे बॅनर काढून टाकावे आणि विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी (Warkari) संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी देखील केली आहे.

त्यांच्या ट्विटमुळे आता मोदी देहू नगरीत यायच्या आधीच वादग्रस्त ठरत आहे की काय अशा चर्चा सुरु आहेत शिवाय भाजप हे बॅनर काढणार की तसंच ठेवणार याकडे सर्व पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT