Mumbai AC Local Train Latest Update SAAM TV
मुंबई/पुणे

Good News! बदलापूरकरांचा प्रवास गारेगार होणार, १४ नव्या एसी लोकलचे वेळापत्रक समोर

14 New AC Locals Added by Central Railway : मध्य रेल्वेकडून बदलापूर, ठाणे आणि सीएसएमटीसाठी १४ नवीन एसी लोकल १६ एप्रिलपासून सुरू होणार. एकूण ८० एसी लोकल्समुळे प्रवाशांचा उन्हाळ्यातील प्रवास अधिक आरामदायी होणार!

Namdeo Kumbhar

Mumbai AC Local News : वाढत्या गर्मीत मुंबईकरांना गारेगार प्रवास करता यावा, यासाठी मध्य रेल्वेनं १६ एप्रिलपासून १४ नव्या एसी लोकल चालवण्याचा (Mumbai AC Local Train Latest Update) निर्णय घेतला आहे. एसी लोकलची संख्या ६६ वरून ८० पर्यंत वाढली आहे. नव्या एसी लोकलमुळे प्रवाशांना कडाक्याच्या उन्हापासून संरक्षण मिळेल आणि प्रवास अधिक आरामदायी होईल. विशेषतः मुंबईच्या दमट आणि गरम हवामानात ही सुविधा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरेल.

या नवीन वातानुकूलित सेवा विद्यमान नॉन-एसी लोकलच्या जागी चालवल्या जातील, ज्यामुळे मध्य रेल्वेच्या एकूण उपनगरीय सेवांची संख्या १,८१० इतकीच राहील. या सेवा सोमवार ते शनिवार कार्यरत असतील, तर रविवार आणि निर्धारित सुट्टीच्या दिवशी नॉन-एसी रॅकसह संबंधित सेवा सुरू राहतील. यामुळे प्रवाशांना आठवड्याच्या प्रत्येक दिवशी प्रवासाची सोय उपलब्ध होईल आणि रेल्वेच्या वेळापत्रकात संतुलन राखले जाईल.

नवीन वातानुकूलित सेवांचे वेळापत्रक:

अप दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने)

१. कल्याण ०७:३४ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०९:०५

२. बदलापूर १०:४२ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२:१२

३. ठाणे १३:२८ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १४:२५

४. ठाणे १५:३६ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १६:३४

५. ठाणे १७:४१ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १८:४०

६. ठाणे १९:४९ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २०:४८

७. बदलापूर २३:०४ - ठाणे २३:५९

डाऊन दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून)

८. विद्याविहार ०६:२६ - कल्याण ०७:२५

९. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०९:०९ - बदलापूर १०:३२

१०. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२:२४ - ठाणे १३:२०

११. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १४:२९ - ठाणे १५:२५

१२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १६:३८ - ठाणे १७:३५

१३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १८:४५ - ठाणे १९:४२

१४. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २१:०८ - बदलापूर २२:५६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT