नेटवर्क मार्केटिंगच्या नावे पुणे शहरात तरुण तरुणींची होतेय मोठी फसवणूक!
नेटवर्क मार्केटिंगच्या नावे पुणे शहरात तरुण तरुणींची होतेय मोठी फसवणूक! SaamTvNews
मुंबई/पुणे

नेटवर्क मार्केटिंगच्या नावे पुणे शहरात तरुण तरुणींची होतेय मोठी फसवणूक!

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुण्यासारख्या मेट्रो सिटीत अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. ज्यामधून अनेकांना आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. मात्र, पुण्याच्या डेक्कन परिसरात अशी एक कंपनी आहे जी महिलांना स्वतःच मंगळ सूत्र गहाण ठेवून व्यवसाय करायला भाग पाडत आहे. पुण्यात येणाऱ्या अनेक तरुण तरुणींची मोठी फसवणूक होत आहे. याबाबत मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे यांच्याकडे काही तरुण तरुणींनी त्यांची कैफियत मांडली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसेच नोकरी मिळेल या आशेने पुणे शहरात राज्याच्या ग्रामीण आणि दुष्काळी भागातून येणाऱ्या तरुण-तरुणींची मोठी संख्या आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पार्ट टाईम जॉब करून स्वतःच्या शैक्षणिक खर्चास हातभार लावावा म्हणून अनेक जण काहीतरी काम मिळेल याचा शोध घेतात. नेमके अश्याच तरुणांना हेरून अत्यंत गोड बोलून, पैशांचे अमिश दाखवून युवकांना दिवसाढवळ्या फसवण्याचा धंदा शहरात अनेक नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांकडून सुरु आहे. या मार्केटिंग कंपन्यांचा शहरात अक्षरशः सुळसुळाट सुरु आहे. राजकीय वरदहस्त असल्याने रोजरोसपणे तरुणांना लाटण्याचे कंत्राटच जणू काही या कंपन्यांना मिळालं आहे कि असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पण, यातून सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील मुला-मुलींची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.

डेक्कन परिसरात जे.एम.शेड जवळ निर्मिती हाईट्स नावाच्या इमारतीमध्ये Naswiz या कंपनीच्या माध्यमातून तरुण-तरुणींना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. या कंपनीकडून अनेक मराठी तरूण-तरुणींची फसवणूक करण्यात येत आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे माथाडी कामगारचे अध्यक्ष निलेश माझीरे यांनी थेट कंपनीत जाऊन त्या प्रशासनाला जाब विचारला आहे.

विद्यार्थ्यांशी मैत्री करून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन, त्यांच्याशी संपर्क करणे, भेटायला बोलवणे, त्यांना वेगवेगळ्या सेमिनार ला बोलावून जॉब चे आणि पैशांचे अमिश देण्याचे काम या कंपनीचे प्रतिनिधी करतात. विशेषतः महिला प्रतिनिधी मार्फत युवकांना जाळ्यात ओढण्याचे रॅकेट चालवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकदा का युवक-युवती या कंपनीच्या ऑफिसमध्ये आले कि, त्यांच्याकडून विविध मार्गाने, पैशांची जुळवाजुळव करून पैसे घेण्यात येतात. या युवकांकडून १२ हजार रुपयांपासून ते लाख रुपयापर्यंतची आयडी बनवून घेण्यात येते.

पुण्यासारख्या मध्यवर्ती भागात ही कंपनी गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या कंपणीबाबत एका फसवणूक झालेल्या महिलेने सांगितले की, ज्यावेळी मी या कंपनीत नोकरीसाठी आले, त्यावेळी ती नोकरी नसून बिजनेस आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे अगोदर 12 हजार रुपये भरून त्यांचं किट घ्यावे लागते. नंतर शंभर रुपये भरून आयडी घ्यावा लागतो. त्यानंतर ते फॅमिलीसाठी पॅकेज देतात. ज्यातून प्रत्येकाकडून पैसे घ्यायचे. माझी तर परिस्थिती अशी केली की, मला पगारही दिला नाही. मला माझे मंगळसूत्र गहाण ठेवून बिझनेस करायला भाग पाडले. या गोष्टींमुळे मी इतकी डिप्रेशनमध्ये गेले होते की, मला आत्महत्या करावीशी वाटत होती. अशीच फसवणूक अनेक महिला, युवक व युवतींसोबत झाली आहे.

माझ्यासारख्या अनेक व्यक्तींची या कंपनीकडून फसवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले. पीडित महिलेलने मनसेचे निलेश माझीरे यांना ही हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी थेट कंपनीत जाऊन जाब विचारला. जर 2 दिवसात फसवण्यात आलेले लोकांचे पैसे परत नाही केले तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. असा इशाराच मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच माझीरे यांनी या कंपनीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कंपनीकडून दबाव टाकण्यात येत असल्याचे माझिरे यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonakshi Sinha : अंधारात दिवा जसा, तसं तुझं सौंदर्य...

Akola Car Accident : शिक्षक आमदाराच्या भावावर दु:खाचा डोंगर; कारचा अपघात, कुटुंबातील सदस्यांसहित ६ ठार

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT