ST Strike: पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीयच, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया - Saam Tv
मुंबई/पुणे

ST Strike: पवारांच्या घरावरील हल्ला निंदनीयच, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात असा प्रकार घडणे अयोग्यच होते, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. (Netizens Unhappy over attack by ST Workers on Sharad Pawar Residence)

शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी दुपारी पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर अचानक हल्ला केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली. रात्री या हल्ल्याला जबाबदार असल्याच्या आरोपाखाली व कामगारांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एसटी कामगारांच्या एका गटाचे नेते अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunwant Sadavarte) यांना अटक केली. साम डिजिटलने ट्विटरवर घेतलेल्या पोलमध्ये नेटकऱ्यांनी सदावर्ते यांच्यावरही टीकेचा भडीमार केला आहे. राजकीय नेत्यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल माध्यमातून या हल्ल्याच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ह्या असल्या बिनडोक ब्रेनवॉश कर्मचा-यांना कामावर घेऊ नका हे दंगाई हिंसक वृत्तीचे लोक प्रवाशाचे जीव धोक्यात घालुन अपघाताच्या नावाखाली प्रवाशांचे खून करतील, अशी प्रतिक्रिया राहुल विघे या नेटकऱ्याने नोंदवली आहे.

काल पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांना सामोरे गेल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. सुप्रिया सुळे यांचे गर्दीतले खरे धाडस ..त्रिवार .अभिनंदन...! आपल्या धाडसाने सारा देश स्तब्ध..!, अशी प्रतिक्रिया सतीश पवनीकर यांनी दिली आहे.

झाला प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारा होता, सर्व सामान्य जनतेच्या मनात याबद्दल शल्य आहे, समाजाच्या सर्व स्तरातून निषेध होत आहे.. पण या मागच्या सुत्रधारास कडक शासन झालेच पाहिजे, असे डाॅ. अनंत पवार यांनी म्हटले आहे.

बडतर्फ करा सगळे आंदोलन करणारे एस टी कर्मचारी, एक मर्यादा असते त्यापुढे जायचे नसते. जेव्हा रूजू झाले सेवेत तेव्हा माहिती नव्हते का हे महामंडळ आहे, निमसरकारी नोकरी आहेतेव्हाच तयारी करायची होती ना सरकारी नोकरीची कोणी आमंत्रण दिले नव्हते एस टी मध्ये कामाला यायला..अशी तिखट प्रतिक्रिया योगेश सपाटे या नेटकऱ्याने दिली आहे.

आपला खून होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया अॅड. सदावर्ते यांनी आज न्यायालयात नेले जात असताना माध्यमांना दिली. त्यावरही नेटकऱ्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. "शासकीय इतमामात सत्कार करा! कोणतीच कमी पडु देऊ नका!सरकारी पाहुणा आहे,"अतिथी देवो भव" म्हणत चांगला पाहुणचार करा! दांडपट्याचे प्रशिक्षण घेतले असेलच तर दांडपट्टा चालवा!,'' असे एका नेटकऱ्याने म्हटले आहेत(204) Uddhav Thackeray : पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री नाराज - YouTube

बरा झाला सापडला तु तर महाराष्ट्र द्रोही आहेस, तुला महाराष्ट्रात हिंसाचार हवा आहे न. घे. आता भाजपा कडुन सुपारी घेतो मराठा आरक्षणावर विरोधी भूमिका घेतो एसटी कामगार यांना भडकवतो, असे एका नेटकऱ्याने सुनावले आहे.

अब.,आया उंट पहाड के नीचे...५ महिने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले यांने...शरद पवारांना शिव्या देऊन मोठा होत हो..आणि नूसता ..डंके की चोट पर ..डंके की चोट पर...बोंबलत होता...आणि सरकारला शिव्या देत होता...आता.....समजेल डंके की चोट ..काय आहे ते..?, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT