Body of NDA air force personnel recovered from Khadakwasla canal after massive search operation in Pune. saam tv
मुंबई/पुणे

Pune : हवाई दलाच्या जवानाचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू, तिथं नेमकं झालं काय?

NDA Air Force Personnel Drowned In Khadakwasla Canal Pune: पुण्यातील खडकवासला परिसरात पोहायला गेलेल्या एनडीएतील हवाई दलाच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: खडकवासला परिसरातील कालव्यात पोहायला गेलेल्या एनडीएतील हवाई दलाच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राजेशकुमार वर्मा (वय 41) असे मृत्यू झालेल्या जवानचे नाव आहे. वर्मा हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) येथे नियुक्तीवर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी वर्मा हे आपल्या सहकाऱ्यांसोबत खडकवासला येथील कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा तोल गेला आणि ते वाहत्या पाण्यात बुडाले, घटनेची माहिती मिळताच सहकाऱ्यानी तात्काळ पोलिसांना कळवले.

यानंतर एनडीएचे पथक, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत व्यापक शोधमोहीम सुरू केली. रविवारी सायंकाळपर्यंत शोध सुरू होता, मात्र अंधार पडल्याने मोहीम थांबवावी लागली. सोमवारी दुपारी सुमारे चार वाजता सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरातील कालव्यात वर्मा यांचा मृतदेह आढळून आला. घटणस्थळापासून सुमारे 700 मीटर अंतरावर कालव्यात पडलेल्या काटेरी झाडात त्यांचा मृतदेह अडकलेला होता, पाण्याच्या हालचालीमुळे तो वर आल्याचे समजते.

मुळशी तहसीलदार विजयकुमार चोभे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन पथक, पीएमआरडीएचे जवान आणि स्कुबा डायव्हर्स यांनी संयुक्तरीत्या मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर वर्मा यांचा मृतदेह एनडीएच्या जवानांकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसला आग

Maharashtra Cabinet : मोठी बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३ धडाकेबाज निर्णय, कुणाला होणार फायदा?

भाजपला मोठा हादरा; दिग्गज नेत्याने पक्ष सोडला, नव्या पक्षाची करणार घोषणा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार होणार ₹ 72,000 ? फिटमेंट फॅक्टरसंबंधी महत्वाची अपडेट

Wedding Dispute: लग्नमंडप की कुस्तीचा आखाडा? “आमच्या लोकांना जेवण का नाही?” प्रश्न विचारताच पाहुण्यांमध्ये जोरदार हाणामारी

SCROLL FOR NEXT