पुणे: अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर (Social media) केल्याची घटना ताजी असताना पुण्यातील भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे.
हे देखील पाहा-
अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर केली होती. यानंतर राज्यात अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिच्या अटकेची मागणी करून कडक कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे. याच दरम्यान पुण्यातील (Pune) भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनी देखील शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे समोर आले आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गणेश नलावडे, दिपक पोकळे, रोहन पायगुडे,अजिंक्य पालकर, दीपक जगताप, संतोष जोशी, आप्पा जाधव, राजेंद्र अलमखाने, प्रसाद गावडे यांनी विनायक आंबेकर यांना त्या पोस्टविषयी जाब विचारला होता. दरम्यान एका कार्यकर्त्यांनी विनायक आंबेकर यांच्या कानाखाली मारली, त्यानंतर सर्व तेथून कार्यकर्ते निघून गेले आहेत. या घटनेची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळताच सर्व जण फडगेट पोलिस चौकीमध्ये पोहचले, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.