eknath shinde
eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

Video : मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' फोटोवरून जयंत पाटील यांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यतेखाली आज दिल्लीत निती आयोगाची सातवी बैठक पार पडली. सदर बैठक दिल्लीच्या राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात पार पडली. या बैठकीत देशातील बहुतांश मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहिले. या निती आयोगाच्या बैठकीचा एक फोटा राज्याच्या राजकारण चर्चेचा विषय ठरला आहे. सदर निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शेवटच्या रांगेत उभे आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. (Jayant Patil news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुणे पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुका, बदललेली प्रभाग रचना आणि राजकीय विषयावर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सदर चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

जयंत पाटील म्हणाले, 'बघा ना, औरंगाजेबासमोर शिवाजी महाराजांना दुसऱ्या रांगेत उभे केले, त्यावेळी त्यांनी सभा सोडून दिली. आता किती बदला झाला आहे. किती झुकावं लागत आहे. दिल्लीचा दरबार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. मात्र, याचं दु:ख वाटत आहे. मात्र, तिथला प्रोटोकॉल हा नावाच्या वर्णक्रमानुसार असतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिसऱ्या रांगेत असतील'.

जयंत पाटील पुढे म्हणाले, 'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सातशे ते साडे सातशे निर्णय घेतले आहेत. तर निवडणुकीला घाबरून जाऊन प्रभाग रचना बदलल्या आहेत. भाजप आणि शिंदे गट यांनी एकत्र येऊन जे निर्णय घेतले आहे, त्याला लोकांचे समर्थन आहे की नाही यासाठी निवडणूका घ्याव्यात', असे ते म्हणाले. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याच्या निर्णयावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, 'मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले गेल्याचे असं मी कधी ऐकलं नाही. शिंदे सरकारची मंत्री नेमण्याची क्षमता नाही आहे, कायदा धाब्यावर बसवून सरकार चालवत आहेत'.

'एकनाथ शिंदे यांनी एवढी लांब उडी मारली आहे. कुणाची विचारधारा केव्हा बदलते सांगता येत नाही. एकनाथ शिंदे हे माझ्या शेजारी बसायचे, त्यांना कधी वाटलं नाही ते मुख्यमंत्री होईल. त्यांचा स्वभाव चांगला आहे. मात्र, त्यांनी जे केलं ते योग्य केलं नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावर सर्वच्या सर्व ४० आमदार हे उद्धव ठाकरे यांना भेटतील, त्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही', असेही पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग; चेकिंग नव्हे स्टंटबाजी, ठाकरे गटाचा आरोप

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

SCROLL FOR NEXT