Sharad pawar  saam tv
मुंबई/पुणे

भाजप त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो; शरद पवारांनी दिली उदाहरणं

भाजप त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपासोबतची युती तोडून राजदसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारलं असता, त्यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे. भाजप त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणेही दिली. (Sharad Pawar Latest News)

काय म्हणाले शरद पवार?

पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचं उदाहरण दिलं. तसेच अकाली दलाला भाजपाने संपवल्याचा आरोपही केला. 'पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष भाजपसोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेताही त्यांच्यासोबत होता. आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे,' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

'भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपाचे नेते त्यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत. परंतू नितीश कुमार यांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. (Sharad Pawar Todays News)

यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या रस्सीखेचावरून आपलं मत मांडलं आहे. 'ज्या वेळेस मी कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडलो त्यानंतर मी पक्षाच्या चिन्हावर हक्क दाखविला नाही अथवा त्यांचे चिन्ह घेतले नाही. वेगळा पक्ष काढला आणि वेगळ चिन्ह घेतलं. त्यामुळं धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही' असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान राज्यात झालेल्या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर पवार यांनी मी त्यावर बोलणार नाही, राज्यातील नेते बोलतील असेही स्पष्ट केले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन|VIDEO

Maharashtra Farmers : हातातोंडाशी आलेला घास पाण्यात, शेतातील कपाशीचं पीक वाया; शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

Maharashtra Live News Update: गेवराईत 3 एकर बागायती जमीन गेली वाहून

Kalyan: कामावर गेला पण परत आलाच नाही, हाय टेन्शन वायरला स्पर्श; विजेचा झटका लागून तरुणाचा जागीच मृत्यू

Pandharpur News: पंढरपूरमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार उघड – दोन ट्रक जप्त|VIDEO

SCROLL FOR NEXT