Jayant Patil  Saam Tv News
मुंबई/पुणे

NCP : पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट होणार? जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे पाटलांचे संकेत

Jayant Patil : पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करण्याची विनंती जयंत पाटलांनी शरद पवारांकडे केलीय. मात्र जयंत पाटलांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? त्यामागे जयंत पाटलांची काही खेळी आहे का?

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टिव्ही

पुणे : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करण्यासाठी पवारांना गळ घालत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तर जयंत पाटलांच्या मागणीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भात शरद पवारांनीही सूचक वक्तव्य केलंय. मात्र जयंत पाटलांनी केलेलं वक्तव्य हे खुर्ची मजबूत करण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलीय.

लोकसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगरमध्ये झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षांतर्गत वाद उफाळून आला होता. याच सभेत रोहित पवारांनी अप्रत्यक्षरित्या जयंत पाटलांना डिवचलं तर जयंत पाटलांनीही विधानसभा निवडणूकीनंतर पदमुक्त होणार असल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं.

खरंतर विधानसभा निवडणूकीत पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागांवरच विजय मिळाल्यानंतर जयंत पाटलांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यातच आता जयंत पाटलांनी तरुणांना संधी देण्यासाठी मला पदमुक्त करा, या विनंतीमागे खुर्ची मजबूत करण्यासाठीची रणनिती आहे की पक्ष सोडण्याचे संकेत? असाच सवाल उपस्थित केला जातोय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT