Nawab Malik Saam Tv
मुंबई/पुणे

Nawab Malik Arrest: मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी रस्त्यावर, अजित पवारही आंदोलनात सहभागी

भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने मनी लॉंड्रिंगप्रकरणी अटक केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी मलिकांच्या मागे ठामपणे उभी असल्याचं चित्र आहे (NCP Protest In Support With Minister Nawab Malik In Presence Of Ajit Pawar).

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या समर्थनार्थ आता राष्ट्रवादी (NCP) रस्त्यावर उतरली आहे. राज्यभर राष्ट्रवादीकडून निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबईतही राष्ट्रवादीचं आंदोलन सुरुये. मुंबईतील गांधी पुतळ्याजवळ मंत्रालयाशेजारी महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत.

या आंदोलनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, रुपाली चकणकर, बाळासाहेब पाटील, अदिती तटकरे, निलोफर मलिक इत्यादी सर्व नेते सहभागी झाले आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT