Amol kolhe vs Thackeray Group 
मुंबई/पुणे

Amol kolhe vs Thackeray Group: अमोल कोल्हेंच्या सत्कार सोहळ्यात गोंधळ; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा

Amol kolhe vs Thackeray Group: अमोल कोल्हेंच्या नागरी सत्कार कार्यक्रमात उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राडा केलाय.

Bharat Jadhav

रोहिदास गाडगे, साम प्रतिनिधी

पुणे: शिवसेना कार्यकर्ते आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना मंचरमध्ये घडलीय. मंचरमध्ये अमोल कोल्हेंचा नागरी सत्कार कार्यक्रम चालू होता त्यावेळी महाविकास आघाडीत मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी राडा केला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सभास्थळावर खासदारअमोल कोल्हे यांच्याशी वाद घातल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत.

अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतून शिवसेना कार्यकर्ते सभेतून निघून गेले. तसेच काही शिवसेना कार्यकर्त्यांनी सभास्थळावर घोषणाबाजी केलीय. देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख होता त्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचा मंच सोडून खाली येऊन जोरदार घोषणाबाजी केली. झालेला गोंधळ पाहून डॉ.अमोल कोल्हे यांनी आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.

सत्कार कार्यक्रमात आमदारकीचा उमेदवार घोषित करणं चुकीचं आहे. इतर पक्षातील नेत्यांशी चर्चा न करता उमेदवार जाहीर करणं हे आम्हाला मान्य नसल्याचं मत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मांडलं. मंचरमध्ये शिवसेनेचा आमदार असतो, ही जागा शिवसेनेची जागा आहे. त्यामुळे येथे शिवसेनेचा उमेदवार असेल, असा दावा कार्यकर्त्यांनी केला.

निर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या सत्कारासाठी मंचर येथे सभा आयोजित करण्यात आली होती.दुसऱ्यांदा खासदार झाल्याबद्दल डॉक्टर कोल्हे यांची मंचर शहरातून मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीचा सांगता समारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. येथे महाविकास आघाडीचे सर्व पक्षातील नेते सहभागी होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर आणि शिवसेनेचे संघटन राजाराम बाणखेले यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. सुरेश भोर आणि बाणखेले यांनी चांगलं मताधिक्य मिळवलं होतं.

दरम्यान, सुरेश भोर व शिवसेनेचे संघटन राजाराम बाणखेले यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील एकूण ६ जागांपैकी किमान दोन जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मिळाव्यात. त्यामध्ये आंबेगावच्या जागेचा समावेश असावा, अशी जाहीर मागणी केली .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

Heavy Rain : बार्शी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; चांदनी नदीला महापूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Purandar Fort History: ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक पुरंदर किल्ला; वाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व

Doctor Strike : पावणेदोन लाख डॉक्टर आज संपावर, आरोग्यसेवेवर मोठा परिणाम | VIDEO

SCROLL FOR NEXT