Rohit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Rohit Pawar : आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढणार? 'त्या' प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत, साम टीव्ही

मुंबई : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बारामती अँग्रो लिमिटेडच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या चौकशीची मागणी करण्यात आली. भाजप आमदार राम शिंदे यांनी ही मागणी केली आहे. (Rohit Pawar News Today)

आमदार राम शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो लिमिटेडच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. मंत्री समितीने १५ ऑक्टोबर रोजी ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची शिफारस केली होती.

मात्र, आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या बारामती अँग्रो कारखान्याचे गाळप त्यापूर्वीच सुरू केले, अशी तक्रार भाजपचे आमदार राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली होती. राम शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवरून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या चौकशी पथकाने या प्रकरणाची चौकशी केली.

चौकशीत पथकाने दिलेल्या अहवालात, बारामती अँग्रो साखर कारखान्याचा गळती हंगाम सुरु झाला नसुन मोळी पूजन करण्यात आल्याचं निदर्शनास आलं, साखर आयुक्तांनी कारखान्याला क्लीन चीट दिली. त्यानंतर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याला क्लिन चीट दिली.

मात्र, साखर आयुक्तांसह बारामती अॅग्रो लिमिटेड प्रशासनाची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो लिमिटेड कारखान्याची उच्चस्तरीय चौकशी होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोनाळ्यात चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू...

Vilas Ghule Case: विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाची चौकशी, ४ तासांच्या चौकशीत नेमकं काय घडलं?

Ex गर्लफ्रेंडसोबत मरायचा प्लान आखला, कारमध्ये बसून बॉम्बस्फोट केला, तरुण जिवंत जळाला अन्..;

चेहऱ्याचं सौंदर्य खुलवतील 'या' 5 टिकली डिझाईन्स; प्रत्येक महिलेने आजच ट्राय करा

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

SCROLL FOR NEXT