Mla Dilip Mohite Patil News SaamTV
मुंबई/पुणे

मोदींच्या राज्यात हिंमत दाखवणं जड जातंय; राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली भीती

राष्ट्रवादी आमदार दिलीप मोहिते पाटीले यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

रोहिदास गाडगे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या राज्यात हिंमत दाखवणं आम्हाला जड जातंय. असं जाहीरपणे कबुली देत, ब्रिटिशांच्या राजवटीची पुनरावृत्ती होते की काय? अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी (Dilip Mohite Patil) व्यक्त केली आहे. पुण्याच्या आळंदीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या जयंती उत्सवात मोहिते उपस्थित होते. (NCP Mla Dilip Mohite Patil Latest Speech)

यावेळी दिलीप मोहिते पाटील त्यांच्या मनोगतातील एक मिनिटं दहा सेकंदाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मोहिते यांनी ब्रिटिशांचा कठीण काळ बोलून दाखवला. तेंव्हा कोणती दाद अन फिर्याद ही नव्हती. कोणी काही करायला गेलं की लगेच शिक्षा व्हायची. याच इतिहासाची आता पुनरावृत्ती होते का? अशी भीती मोहितेंनी व्यक्त केली. (Mla Dilip Mohite Patil News)

भाजपमध्ये गेल्यावर काहीही बोललं तरी ईडी-सीडी अशी कोणतीच भानगड मागे लागत नाही. पण मोदींच्या राज्यात आम्ही काही बोलायचं म्हटलं की लगेच फोन येतो, तुमच्या दोन फाईल पाठविल्या आहेत. त्यामुळे आत्ताचा कार्यकर्ता भीतीच्या सावटाखाली जगतोय. लोकशाही कोणी वाचवायची असा प्रश्न मला पडलाय, अन आता परत लोकशाहीर अण्णा भाऊ जन्माला येतील याबाबत ही मला शंका आहे. असं मत मोहितेंनी व्यक्त केलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्रह्म मुहूर्तावर 'या' शब्दांचा जप करणं आहे शुभं, वर्षभर घरी येईल पैसा

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

SCROLL FOR NEXT