NCP Meeting saam Tv
मुंबई/पुणे

NCP Meeting Dispute: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये खडाजंगी

NCP Meeting : देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपआपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कामाला लागले आहेत. मतदारसंघ आणि तिकिटासांठी ही चाचपणी करताना उमेदवारांची खडाजंगी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

Bharat Jadhav

NCP Meeting Dispute Mumbai :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार गटाची बैठक झाली. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी मतदारसंघाच्या मागणीवरून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. हा वाद ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून झाला होता. वादामुळे ऐन बैठकीतून मुंबई अध्यक्ष राखी जाधव बाहेर पडल्या आहेत. (Latest News)

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपआपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करत आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवाराला तिकीट दिलं गेलं पाहिजे. याची चाचपणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट कामाला लागले आहेत. मतदारसंघ आणि तिकिटासांठी ही चाचपणी करताना उमेदवारांची खडाजंगी होत आहे.

विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय. मुंबईतील दोन अन्य गटात वाद झाल्याने मुंबईचे पदाधिकारी बैठकीतून बाहेर पडले आहेत. शरद पवार गटाला ईशान्य मुंबई (Mumbai) मतदारसंघ (Constituency) मिळावा, अशी मागणी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. तर दुसरीकडे, युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख मुंबईचे युवकचे अध्यक्ष निलेश भोसले यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी मागणी केली होती.

यावरूनच दोन गटांमध्ये वाद पाहिला मिळाला विशेष बाब म्हणजे यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मुंबई (Mumbai) अध्यक्ष राखी जाधव हे दोघेदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. वाद झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना शांत राहायचा आवाहन करत बाजूला केलं. दरम्यान वाद चालू असताना बैठकीतून बाहेर पडलेल्या राखी जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय. कार्यकर्त्यांचा वाद नाहीये.

ईशान्य मुंबईत आपला उमेदवार असावा, अशी मागणी होती. इतरत्र कुठेही आमची मागणी नव्हती. कार्यकर्त्यांनी आपले म्हणणं मांडले आहे.राष्ट्रवादीत कुठलाही गट नाहीय. प्रत्येकाला अधिकार आहे मत व्यक्त करायचा, तसा तो त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "राजकारण करू नका..."; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचा फुल पाठिंबा, पाहा भाईजान नेमकं काय म्हणाला?

Maharashtra News Live Update: डेंगूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका महापालिकेचे खाजगी रुग्णालयांना पत्र

Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

8th Pay Commision : २.० फिटमेंट फॅक्टरमुळे तुमच्या पगारात होईल दुप्पट वाढ, कशी? जाणून घ्या सविस्तर

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT