NCP Maharashtra Slams BJP Chandrashekhar Bawankule on criticize to Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: जेवढी पवार साहेबांची राजकीय कारकीर्द, तितकं तुमचं वय; राष्ट्रवादीने टोचले बावनकुळेंचे कान

Maharashtra Politics News: विरोधकांनी नाक घासून जनतेची माफी मागावी, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.

Satish Daud

NCP Slams Chandrashekhar Bawankule

राज्यातील कंत्राटी भरतीवरून महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात आहेत. कंत्राटी भरतीचं पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचं असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांनी नाक घासून जनतेची माफी मागावी, अशी टीका केली होती. दरम्यान, बावनकुळेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगलाच समाचार घेण्यात आला.  (Latest Marathi News)

“आदरणीय पवार साहेब (Sharad Pawar) यांची जेवढी राजकीय कारकीर्द आहे तितकं बावनकुळे यांचं वय आहे. याची जाण तुम्हाला उशिरा का होईना झाली हे महत्वाचं, असा टोला राष्ट्रवादीकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावण्यात आला. कंत्राटी भरतीच्या आरोपावरून राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ट्विट केलं आहे.

आदरणीय साहेबांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही तपास यंत्रणांचा गैरवापर करून फोडाफोडीचं राजकारण करून घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापण्याची मुळीच राहिलेली नाही. पवार साहेबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा यांच्या हिताचे जे सर्वसमावेशक निर्णय घेतले त्याची सर तुम्हाला येणार नाही हे महाराष्ट्र जाणतो, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने बावनकुळेंचे कान टोचले आहेत.

स्व. यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेल्या राजकीय आदर्शावर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. जातीय तेढ निर्माण करणं, विकासाऐवजी केवळ धर्माचं राजकारण करणं ही वृत्ती पवार साहेबांनी कधीच जोपासली नाही. तुम्ही कितीही रेटून खोटं बोलून तुमचं कंत्राटी भरतीचं पाप दुसऱ्याच्या माथी टाकण्याचा प्रयत्न करा, महाराष्ट्राला हे चांगलेच माहित आहे की, त्यावेळेसच्या कॅबिनेटमधील मंत्री जे तुमच्यासोबत आता सत्तेत आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करण्यास असमर्थ आहात, अशी टीका देखील राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

बावनकुळेजी...आपल्या संपूर्ण हयातीत आदरणीय पवार साहेबांनी सत्तेच्या स्वार्थासाठी दिल्लीच्या तख्तापुढे गुडघे टेकले नाहीत बरं... तर मतांसाठी धार्मिक राजकारणही केलं नाही. आदरणीय पवार साहेब स्वाभिमानाने ‘महाराष्ट्र धर्म’ पाळणारे आहेत. कारण छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार त्यांच्या आचरणात आहे, १३० कोटी देशवासियांची फसवणूक करणाऱ्या ढोंगी वृत्तीचा नव्हे, असंही राष्ट्रवादीने पोष्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT