nashik news  Saam tv
मुंबई/पुणे

Ashok Kharat Video : रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे निर्देश; 'कॅप्टन फाइल्स' भोवली, सूत्रांची माहिती

Ashok kharat news : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्याचे दिसत आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर अडचणीत आल्यात

राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याचे संकेत समोर आलेत

महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांना भोवल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्याने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात अशोक खरातवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे पाद्य पूजन करतानाचे रुपाली चाकणकरांचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

या फोटो आणि व्हिडिओनंतर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. तर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. याचदम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक खरात प्रकरणात अडचणीत आल्यानंतर चाकणकर यांना पक्षाने राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. पक्षाने राजीनामा देण्याचे आदेश दिल्याने रुपाली चाकणकर या आणखी अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.

एकीकडे राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आली आहे. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी पोस्ट करत म्हटलं की,पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले. या पत्रात खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल आणि वस्तुनिष्ठ तपास व्हावा. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी आणि आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुंबईतून धक्कादायक बातमी! भीषण अपघातात ज्येष्ठ शिवसैनिकाने गमावला जीव; परिसरात हळहळ

Pune Fort : पुरंदरच्या शेजारी उभा आहे पराक्रम अन् शौर्याचा साक्षीदार, 'हा' ऐतिहासिक किल्ला पाहिलात का?

Monsoon Update : राज्यात हिट वेव्ह! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Deool Band 2 Collection : आरं रं रं रं रं रं खतरनाक! मराठी चित्रपटांत 'देऊळ बंद २'चा डंका, प्रवीण तरडेंचा सिनेमा १०० कोटींपासून काही पावले दूर

SCROLL FOR NEXT