supriya sule
supriya sule saam tv
मुंबई/पुणे

Supriya Sule News: 'फक्त सत्तेतील दिवस चांगले नसतात, तर...'; सुप्रिया सुळे यांचा शिंदे सरकारवर जोरदार निशाणा

मंगेश कचरे

Supriya Sule News : 'फक्त सत्तेतील दिवस हे चांगले दिवस नसतात. विरोधातले दिवस फार चांगले असतात, मला विरोधात असताना भाषण करायला फार मजा येते, असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले. 'रोज टीका करून मी आता थकले. हे रोज चुकतात म्हणून रोज टीका करावी लागते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील इंदापूर तालुक्यातील कौठाळी येथे विकास कामांचा शुभारंभ केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी हळदी कुंकवाचा शुभारंभ केला. या वेळी सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांना कुंकू लावून शुभारंभ केला.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या, ' विधवा महिला खूप अडचणीत जगत असतात. हळदी कुंकू हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे. एकल शब्द वापरावा पण विधवा म्हणू नका. अशा महिला कधी कुंकू लावत नाहीत. म्हणून मी ज्या ठिकाणी जाते त्या महिलांना कुंकू लावायला सांगते, असे सुळे म्हणाल्या.

स्थानिक निवडणुकांवरील सुनावणीवर भाष्य करताना सुळे म्हणाल्या, 'सुनावणी पुढे गेली यात आश्चर्य वाटत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये ईडी सरकारला यश मिळणार नाही हे मी सातत्याने सांगते आहे. सर्वसामान्य लोकांची अडचण होते, त्यांनी जायचे कुणाकडे? कुठेल ना कुठले कारण सांगून हे सरकार निवडणूक पुढे ढकलत आहे. यात नुकसान जनतेचे होत आहे'.

दरम्यान, कुर्ला पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांचा पुत्र फराज मलिक विरोधात फसवणूक आणि फॉर्जरीचा गुन्हा दाखल केला आहे.यावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या, काही कुटुंब अशी आहेत की त्यांच्यावर सारख्याच तक्रारी होतात. त्याच्यात मला काही आश्चर्य वाटत नाही. हे सुडाचे राजकारण राज्यात थांबत नाहीये. असे आरोप हे विरोधी पक्षावर झाले आहेत'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Shinde: पीएम मोदींप्रमाणे मी ही सुट्टी न घेता काम करतोय: मुख्यमंत्री शिंदे

WhatsApp New Feature: वॉट्सअ‍ॅपच्या स्टोअरेजची चिंता मिटली; वाचा नवं Chat Filterer नेमकं आहे तरी काय?

Today's Marathi News Live : ठाकरेंच्या खासदाराने १० वर्ष टीकेशिवाय दुसरं काही केलं नाही, नारायण राणेंची टीका

Hair Care Tips: सिल्की स्मूथ केसांसाठी घरच्याघरी करा केराटिन ट्रिटमेंट

Girish Mahajan News : त्यानंतरच खडसेंनी भाजपचा प्रचार करावा; मंत्री गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT