Sharad Pawar vs Narendra Modi Saam TV
मुंबई/पुणे

Vedanta Foxconn : 'वेदांता'वरून शरद पवारांनी 'त्या' एकाच वाक्यात PM मोदी, CM शिंदेंवर साधला निशाणा

'गुजरातला गेलेला हा प्रकल्प पुन्हा येणे अशक्य आहे'

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी वेदांत प्रकल्पावरून पहिल्यांदाच भाष्य केलंय. वेदांत प्रकल्प हा महाराष्ट्राच्या बाहेर जायला नको होता. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्वाचा होता. आता आरोप-प्रत्यारोप करून काहीही साध्य होणार नाही, वेदांत प्रकल्पाचं खापर ठाकरे सरकारवर फोडणं अयोग्य आहे. महाराष्ट्राला नवीन काय मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे असं शरद पवार म्हणालेत. (Sharad Pawar News)

इतकंच नाही तर, वेदांत प्रकल्पावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोलाही हाणलाय. 'महाराष्ट्रात मोठे प्रकल्प आणू, असे सांगणे म्हणजे लहान मुलांची समजूत काढण्यासारखे आहे, साधारणतः केंद्राची सत्ता हातात असेल तर काही प्रकल्प गुजरातला गेले त्यावर तक्रार करण्यात अर्थ नाही, गुजरातवर लक्ष दिलं तर साहाजिकच कुठल्याही माणसाला घरची ओढ असते. असं म्हणत नाव न घेता पवारांनी मोंदीना टोला हाणलाय.

"वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे हे दुदैवी, गुजरातला गेलेला हा प्रकल्प पुन्हा येणे अशक्य आहे, महाराष्ट्रात मोठे प्रकल्प आणू, असे सांगणे म्हणजे लहान मुलांची समजूत काढण्यासारखे आहे," असंही शरद पवार यावेळी म्हणाले. (PM Modi Todays News)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी ‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली. प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण्याची शक्यता नाही असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे पवार यांनी हे नको व्हायला होतं. पण हे झालं आहे. आता झालं ते झालं याची चर्चा बंद करुन नवं काय करता येईल त्याची चर्चा करु असं मत व्यक्त केलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत, एकनाथ शिंदे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रीमंडळाने दुर्लक्ष केल्याचे आरोप केले. मला वाटतं हे शहाणपणाचं लक्षण नाही. पंतप्रधानांच्या भेटीची चर्चा झाली. ते मदत करतील, तर आनंद आहे. पण आणखीन एक प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं म्हणतायत,” असं सांगत शरद पवार यांनी एक उदाहरण दिलं. “एका घरात एका लहान मुलाला एक फुगा दिला, दुसऱ्या मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असं म्हणणं असा हा प्रकार आहे,” असा टोला पवारांनी लगावला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT