Nagar, Shambhuraj Desai , Supriya Sule saam tv
मुंबई/पुणे

Supriya Sule : शंभूराज देसाईंच्या 'त्या' वक्तव्यावर सुप्रिया सुळे दुःखी

सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील : खासदार सुप्रिया सुळे

सचिन आगरवाल

Supriya Sule News : भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डा यांचा एकपक्ष एक देश असा विचार आहे तर आमचा विचार तसा नसून एक देश अनेक पक्ष असा विचार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी येथे म्हटलं. तसेच कुठलाही पक्ष छोटा मोठा नसतो. त्याच्यामागे एक वैचारिक बैठक असते. भाजप हा मोठा पक्ष आहे. देश पातळीवरचा पक्ष आहे. ते राजे आहेत. त्यांनी छोट्या लोकांची चेष्टा करावी ही त्यांची संस्कृती असेल असा टोला ही सुळेंनी भाजपला लगावला. दरम्यान भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा उल्लेख करताना भारतीय जनता लॉन्ड्रीचे अध्यक्ष असा उल्लेख देखील सुप्रिया सुळेंनी केला.

दरम्यान सुळे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्या विधिमंडळाच्या पाय-यांवरील वक्तव्याचा देखील येथे समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुणे येथे केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते देखील चांगलेच अडचणी सापडले आहेत. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या एखाद्या मुद्द्यावर मत मांडणं यात काही चुकीचं नाही. छगन भुजबळ यांनी मांडलेला विचार आहे. याबाबत भेटल्यावरती नक्कीच मार्गदर्शन घेईल. कोणीही मत मांडले म्हणजे तो शत्रू झाला असं होत नाही असेही सुळेंनी नमूद केले.

संविधानाने त्याला तो अधिकार दिला असतो परंतु सत्ताधारी पक्षाला दडपशाहीची सवय झाली आहे. मी म्हणेन तसंच वागलं पाहिजे यामुळे संविधानाचा अपमान होत आहे असे मत खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

...तर तुम्ही दुसरं घर करा

शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळेच शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. ही लढाई दुर्दैवी असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चालतं सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेलं मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा तुम्हालाही शुभेच्छा परंतु अशाप्रकारे ठाकरे कुटुंबावर आरोप करण हे दुर्दैवी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं.

बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील

शरद पवार यांच्यावर ज्यावेळेस काँग्रेसने कारवाई केली. त्यावेळेस साहेबांनी स्वतंत्र पक्ष काढून उभे राहिले. त्यावेळेस त्यांनी काँग्रेस माझी आहे. यातले माणसं माझी आहे असे म्हटले नाही. सध्याचे राजकारण पाहून बाळासाहेबांना खूप वेदना होत असतील असेही सुप्रिया सुळेंनी नमूद केले.

आम्हांला खूप दुःख होतंय

खासदार सुप्रिया सुळेंनी मंत्री शंभूराज देसाई यांना एक टाेला लगावला. त्या म्हणाल्या देसाई यांचे वक्तव्य टिव्हीवर ऐकलं. तुम्हाला पण खोके हवे आहेत का ? ते असं म्हटले नाहीत की आम्ही घेतले नाहीत. त्यांच्या या विधानावर आम्हांला खूप दुःख होतंय असेही सुळेंनी नमूद केले. एवरी थिंग इज ओके. तुम्हाला हे सगळं ओके वाटत असेल पण आम्ही यासाठी राजकारणात नाही आलो. आम्ही राजकारणात आलो ते सगळ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही असा टोला सुप्रिया सुळे यांनी शंभुराजे देसाई यांना लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT