ajit pawar news  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : अजित पवार आठवडाभर कुठे होते? राष्ट्रवादीतील नाराजीच्या चर्चेवर स्वतःच केला खुलासा

अजित पवार कुठे गेलेत, ते बोलत का नाहीत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय झाले आहेत. अजित पवार यांनी आज मावळमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी पाच दिवस कुठे होतो? याचा उलगडा केला आहे. मी पाच दिवस आजारी होतो, माझी प्रकृती बरी नव्हती, असं सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Ajit Pawar News Today)

राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या अधिवेशनापासून सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यातील (Pune News) मावळ दौऱ्यावर आहेत. अजित पवार कुठे गेलेत, ते बोलत का नाहीत अशी चर्चा गेले काही दिवस होती. जवळपास सात दिवसानंतर अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पाच दिवस कुठे होतो, याचा उलगडा केला आहे.

'मी पाच सहा वर्षात परदेशात गेलो नव्हतो, माझा सहा महिन्यांपूर्वी दौरा ठरला होता, मी ४ तारखेला गेलो अन काल रात्री लेट आलो, पण उगाचच काहीही बातम्या आल्या,वारेमाप चर्चा करायची आणि बदनामी करायची, काय दादा वाचून याचं आडलं होत काय माहिती?' असं म्हणत अजितदादांनी नाराज असलेल्या चर्चावर भाष्य केलं आहे.

एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही आमदार फुटणार असल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. यादरम्यान विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे गेल्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची चर्चा होती.

शिर्डी येथील शिबिरात अजित पवारांची अनुपस्थिती म्हणजे दादा नाराज तर नाहीत ना, गुवाहटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे कुछ तो गडबड है, असं ट्वीट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं होतं. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं होते. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत का? अशी चर्चाही सुरू झाली होती. मात्र, आज स्वत: अजित पवार यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medical Education Scam : मेडिकल शिक्षण क्षेत्राला हादरवणारा घोटाळा, महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये कॉलेजांवर धाड

Bank Fraud Alert : PWD घोटाळ्याचा पर्दाफाश! SBI अधिकाऱ्याच्या सतर्कतेने १११ कोटींची लूट टळली

Bhindi Bhaji Benefits: हिवाळ्यात भेंडी खा, हाडे दुखींना मिळेल आराम

IND vs SA: टेस्टमधील दारूण पराभवानंतर कोचपदावरून गंभीरची हकालपट्टी? अखेर बीसीसीआयने दिलं उत्तर

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीला स्थगिती ,जिल्हाधिकारी यांची माहिती

SCROLL FOR NEXT