Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar : वाचाळवीरांना आवारा, आवरा, आवरा... अजित पवारांकडून मंगलप्रभात लोढांना त्यांच्या शैलीत शाब्दिक डोस

एखाद्याला ठेच लागली तर दुसरा आपल्याला ठेच लागणार नाही असे प्रयत्न करतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्तानंतर शिंदे-भाजप सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तुलना शिवरायांची केल्याने वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तर या वाचाळवीरांना आवरा असा सल्ला सत्तेतील वरिष्ठांना दिला आहे.

अजित पवार म्हणाले की, वाचाळवीरांना आवारा, आवरा, आवरा... सातत्याने आम्ही सांगतोय तरी देखील त्यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना येतात.हे बोलायला एक जातात परंतु त्याच्यातून अर्थ वेगळा निघतो. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा आपल्याला ठेच लागणार नाही असे प्रयत्न करतो. मात्र यांच्यात तर हे दिसतच नाही, उलट चढाओढ लागली आहे.  (Latest Marathi News)

एक चूकला की लगेच दुसरा चूक करतो, मग तिसरा. हे कधी थांबणार मला कळतच नाही. एकनाथ शिंदे स्टेजवर असताना त्यांच्यासमोरच तुलना केली. आपण शिवरायांची कुणाशी तुलना करतोय, काय करतोय आपल्यावर जबाबदारी काय, आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाही होऊ शकते का? हे महाराष्ट्रात कधी घडलंय का? हे देखील यांना कळत नाही. राज्यातील तमाम जनता यांना पाहत आहे. एकदा निवडणुका लागू द्या मग यांना कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

काय म्हणाले मंगप्रभात लोढा?

प्रतापगडावरील उपस्थिताना संबोधित करताना मंगलप्रभात लोढा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगाजेबाने पकडून आग्र्याच्या किल्ल्यात जेव्हा बंदीस्त केलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज हे स्वत: साठी नाही तर हिंदवी स्वराज्यासाठी युक्ती काढत सुटका करून घेतली. त्यामुळेच भारतात हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. असाच प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचा झाला. पण एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तशीच सुटका करून घेतली आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचं सरकार स्थापन झालं, असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप

दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. "भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं हे वक्तव्य चुकून आलेलं आहे किंवा भाषणाच्या ओघात त्यांनी अशी तुलना केली, असं मी मानत नाही. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपचा हा एक प्लॅन आहे. महाराजांचा अपमान हा भारतीय जनता पक्षाचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे", असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT