Ajit Pawar  saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar On Mahavikas Aghadi: 'स्टॅम्प पेपरवर लिहून देतो महाविकास आघाडी एकत्र राहणार', अजित पवारांचा मोठा दावा

NCP Latest News: मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले आहे.

Priya More

Mumbai News: 'स्टॅम्प पेपरवर लिहून देतो महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र राहणार', असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फार्म्युला अजून ठरवला नाही, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केले आहे.

महाविकास आघाडी पुढच्या निवडणुकीत एकत्र राहणार का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवारांनी सांगितले की, '100 टक्के महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. त्याच्यावर मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले सह्या करुन देतो.'

जागा वाटपाबाबत अजित पवारांनी सांगितले की, '16-16-16 चा फॉर्म्युला ठरला आहे हे मला माहिती नाही. मात्र मागे उद्धव ठाकरेंशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले होते की, आम्ही मागच्या काळात जिंकलेल्या जागा आम्हाला राहाव्यात अशी आमची इच्छा आहे.' तसंच, 'शिवसेना- काँग्रेस-राष्ट्रवादीचे आता सिटींग एमपी आहेत. तेवढ्या जागा बाजूला ठेवून 25 जागांबाबत पहिली चर्चा करावी. 25 जागांवर चर्चा करायला हरकत नाही कारण या जागा आमच्या तिन्ही पक्षाकडे नाही आहेत. महाविकास आघाडीचे वरिष्ठ अधिकारी जागा वाटपाचा निर्णय घेतील', असं देखील त्यांनी सांगितले.

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामधील नाराजीच्या चर्चा सध्या पुन्हा रंगू लागल्या आहेत. याबद्दल अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'जेव्हापासून आम्ही सत्तेत आहे, मी कोणत्याही व्यक्तीसंदर्भात वक्तव्य केले आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलावले नाही. याआधी अनेक नेत्यांना ईडीने (ED) चौकशीसाठी बोलावले आहे. त्यावेळी मी काही वक्तव्य केले असेल तर मला दाखवा. तुम्ही जाणीवपूर्वक काही अर्थ काढण्याचा प्रयत्न करता.', असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : कल्याणमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने घेतलं धनुष्यबाण हाती

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं! १०५ समजून २०५ मध्ये गेली, तिघांनी सामूहिक बलात्कार केला अन्...

Public Holiday: राज्यात शनिवारी या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी; शाळा, सरकारी कार्यालये राहणार बंद

Jeffrey Epstein Photo : ६८ फोटो अन् चॅट्स रिलीज, बिल गेट्स महिलांसोबत दिसले, एपस्टीन फाईल आज सार्वजनिक होणार

SCROLL FOR NEXT