Manohar Joshi Health Update: मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु

अस्वस्थ वाटत असल्याने मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Manohar Joshi
Manohar JoshiSaam Tv
Published On

निवृत्ती बाबर

Manohar Joshi News Today: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. कालपासून मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदूजा रुग्णलयात दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

Manohar Joshi
Pune Water Cut News : पुणेकरांनाे ! 'या' दिवशी तुमच्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद; जाणून घ्या 'रोटेशन' पद्धत

गेल्या काही काळापासून मनोहर जोशी (Mahohar Joshi) राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सध्या उपचार सुरु आहेत. थोड्याच वेळात  हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून (Doctor) लवकरच मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाईल.

Manohar Joshi
Nandurbar Accident News: चांदशैली घाटात पिकअप दरीत कोसळली; अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

मनोहर जोशी हे मूळचे बीडचे असून त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावात झाला. शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईत स्थलांतरीत झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणूनही नोकरी केली.

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबईचे महापौरपदही त्यांनी 1976 ते 1977 या काळात भूषवलं होतं. तर शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com