पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'पे अँड पार्क' विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक  गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'पे अँड पार्क' विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

महापालिकेने शहरात एक जुलै पासून लागू केलेली पे अँड पार्क योजना त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज महापालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात एक जुलै पासून लागू केलेली पे अँड पार्क योजना त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज महापालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून महापालिकेने उद्घाटन करून सुरू केलेल्या पे अँड पार्क फलकाला काळे फासण्यात आले. NCP is aggressive against Pimpri-Chinchwad Municipal Corporation's 'Pay and Park'

हे देखील पहा -

दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीने होरपळलेल्या पिंपरी-चिंचवडकरांवर महापालिका पे अँड पार्क योजनेच्या माध्यमातून आर्थिक भुर्दंड लादत आहे. महापालिकेकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत असताना देखील महापालिका पे अँन्ड पार्क योजनेच्या नावावर नागरिकांच्या खिशात हात घालून पैसे वसूल करत असल्याने पे अँड पार्क योजना तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

येत्या आठ दिवसांत पे अँड पार्क योजना महापालिकेने बंद केली नाही तर आम्ही पिंपरी-चिंचवड महापालिकेला कुलूप ठोकल्या शिवाय गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आला आहे. आंदोलनावेळी राष्ट्र्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी कडून देण्यात आलेल्या या इशाऱ्यावर महापालिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kalyan : मराठी-हिंदी वाद सुरू असतानाच शिवसेनेत शेकडो उत्तर भारतीयांचा प्रवेश

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT