ncp crisis ajit pawar Group appeal vidhimandal court against sharad pawar group maharashtra politics  Saam TV
मुंबई/पुणे

NCP Crisis: राष्ट्रवादीत संघर्षाची ठिणगी! शरद पवारांना धक्का देण्यासाठी अजितदादांनी आखला मोठा प्लान

Ajit Pawar vs Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शरद पवार गटाविरोधात आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

Satish Daud

Ajit Pawar vs Sharad Pawar News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने शरद पवार गटाविरोधात आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार यांच्या गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी अजित पवार यांनी नवी चाल खेळली आहे. पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत शरद पवार गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करणारी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इतकंच नाही, तर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे, असा दावा देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेनंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांचा गट दोन महिन्यापासून सत्तेत सामील झाला आहे. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली.  (Latest Marathi News)

या ९ आमदारांना निलंबित करा, अशी मागणी देखील शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून करण्यात आली. त्याचबरोबर अजित पवार यांना समर्थन देणाऱ्या आमदारांना शरद पवार गटाने अपात्रतेची नोटीस धाडली. दरम्यान, शरद पवार गटाच्या या कारवाईमुळे अजित पवार गट आक्रमक झाला आहे.

विधिमंडळ अध्यक्षांना पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपणच खरी राष्ट्रवादी असा दावा देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. यापुढेही अजित पवार गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

Dnyanada Ramtirthkar: अवखळ हासरी, अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी ...

SCROLL FOR NEXT