Sharad Pawar news  saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar Group News: पुण्यात शरद पवारांनी बोलावली आमदार-खासदारांची बैठक; अजित गटाच्या आरोपांना काय प्रत्युत्तर देणार?

Sharad Pawar News in Marathi: अजित पवार गटाच्या कर्जत मेळाव्यानंतर शरद पवार गटाने आमदार-खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शरद पवार हे अजित पवार गटाच्या आरोपांना उत्तर देणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

Sharad Pawar News In Marathi:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटाचा निर्धार मेळावा कर्जतमध्ये सुरू आहे. या दोन दिवसीय मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार गटाच्या कर्जत मेळाव्यानंतर शरद पवार गटाने आमदार-खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शरद पवार हे अजित पवार गटाच्या आरोपांना उत्तर देणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. (Latest Marathi News)

शरद पवारांनी बोलावली आमदार-खासदारांची बैठक

पुण्यात शरद पवारांनी (Sharad Pawar) उद्या पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आमदार आणि खासदार उपस्थित राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निसर्ग कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीला जयंत पाटील देखील उपस्थित राहतील.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार अजित पवारांना काय प्रत्युत्तर देणार?

पक्षाच्या बैठकीत सर्व आमदार शरद पवारांना भेटणार आहेत. कर्जतच्या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) गटाने शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आमदारांची बैठक बोलावल्याचं बोललं जात आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर या बैठकीत अजित पवारांच्या आरोपांना स्वत: शरद पवार काय प्रत्युत्तर देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

अजित पवार हे शरद पवारांवर काय म्हणाले?

'आम्ही १०-१२ जण देवगिरी बंगल्यावर बसलो होतो. भाजपसोबत जाण्याविषयी साहेबांना सांगितलं तर काय होईल. या विचारामुळे मी ताईंना बोलावलं आणि सांगितलं. ताईंनी वेळ मागितला आणि त्यानंतर आम्ही देखील थांबलो. त्यानंतर मला घरी बोलावलं, त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, असे पवारांनी सांगितलं. याबाबत आम्हाला घरातील ४ लोकांना माहीत होते, असे अजित पवारांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT