Sharad Pawar
Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar On Odisha Train Accident: 'ओडिशा रेल्वे अपघात गंभीर, चौकशी करा'; जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले...

Vishal Gangurde

सचिन जाधव

Sharad Pawar News: ओडिशा येथील बालासोर येथे तीन रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारकडून या अपघातातील जखमींसाठी बचावकार्य सुरू आहे. या ओडिशा अपघातावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'ओडिशा अपघात अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी पुण्यातील सहकार परिषदेला हजेरी लावली. या परिषदेनंतर शरद पवार प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी देशातील विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्या. याचबरोबर शरद पवार यांनी ओडिशाचा रेल्वे अपघात अत्यंत गंभीर असून चौकशीची मागणी केली आहे.

शरद पवार म्हणाले, 'माजी पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरूंच्या काळात दोन अपघात झाले होते. त्यावेळी मंत्री असलेले लालबहादुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. नैतिक बाळगली. आजच्या राजकारण्यांना जे वाटत ते करावं. अपघात अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी व्हायला हवी'.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अपघातस्थळाचा आढावा

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २६१ जणांचा बळी गेला आहे. तर या अपघातात ३५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या अपघातस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते अपघातस्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मोदींसोबत अनेक बडे नेते आणि अधिकारीही उपस्थित आहे.

ममता बॅनर्जींनी व्यक्त केला संशय

तर ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताच्या दुर्घटनेनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातस्थळी भेट दिली. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चाही केली . यावेळी ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर संशय व्यक्त करून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

ममता बॅनर्जी यांनी या दुर्घटनेनंतर शंका व्यक्त केली. नक्कीच काहीतरी झालंय. सखोल चौकशी व्हायला हवी, असा संशय ममतांनी व्यक्त केला. रेल्वे प्रशासनावरही त्यांनी निशाणा साधला. समन्वयाचा अभाव असल्याचं त्या म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

Today's Marathi News Live : उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Jat Drought Area : पाण्याचे स्त्रोत आटले; 2 दिवसांत म्हैसाळ सिंचनातून तलाव, विहिरी भरणार : जत प्रांताधिकारी

SCROLL FOR NEXT