Doctor Tatyarao Lahane Resignation: जेजे रुग्णालय वाद प्रकरण, डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा सरकारने केला मंजूर

JJ Hospital Case: डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे टाकले होते.
Dr Tatyarao Lahane On JJ Hospital
Dr Tatyarao Lahane On JJ HospitalSaam Tv
Published On

JJ Hospital Case: जेजे रुग्णालयातील (JJ Hospital) प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केला आहे. जेजे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्स विभागातील डॉक्टर, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना त्रास देतात त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या आरोपानंतर डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे टाकले होते. याप्रकरणावर तात्याराव लहाने यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. यानंतर आता सराकरने त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला आहे.

Dr Tatyarao Lahane On JJ Hospital
Odisha Train Accident: 'देवाने आम्हाला दुसरं आयुष्य दिलं', अपघातातून अख्खं कुटुंब वाचलं, सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

सरकारने राजीनामा मंजूर केल्यानंतर साम टीव्हीशी बोलताना तात्याराव लहाने यांनी सांगितले की, 'मी राजीनामा देत सरकारला मंजूर करण्याबाबत विनंती केली होती. सरकारने माझा राजीनामा मंजूर केला आहे. याबद्दल शासनाचा आभारी आहे.' दरम्यान, जेजे रुग्णालयातील वरिष्ठ डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्यावर निवासी डॉक्टरांनी अनेक गंभीर आरोप केलेत.

हे सर्व डॉक्टर आणि प्राध्यापक दादागिरी करतात आणि शस्त्रक्रिया करू देत नसल्याचे निवासी डॉक्टरांनी आरोप केले. हे आरोप करत जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. जेजे रुग्णालयातील 750 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. विद्यार्थ्यांच्या या आरोपानंतर 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

Dr Tatyarao Lahane On JJ Hospital
Coromandel Express Accident: तेच ठिकाण, तीच कोरोमंडल ट्रेन आणि तोच शुक्रवार; 14 वर्षांपूर्वीच्या जखमा भळभळल्या

तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी त्यांनी आमचा आणि जेजे रुग्णालयाशी संबंध नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'एकतर्फी बाजू ऐकून घेत रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमची चौकशी करा अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला.'

Dr Tatyarao Lahane On JJ Hospital
Pankaja Munde Speech: 'माझा एवढा मोठा बाप राहिला नाही अन् आता...'; पंकजा मुंडे बोलता बोलता रडायला लागल्या

'31 तारखेला राजीनामे दिलेले आहेत. तरीही अधिष्ठाता म्हणतात, राजीनामा मिळालेला नाही. त्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे. आमच्यावर शस्त्रक्रिया चोरल्याचा आरोप झाला. हे ऐकून मी उद्विग्न झालो. आम्ही 30 पिढ्या घडवल्या. इथे बसलेले सर्व डॉक्टर प्रत्येकी एका पीजी विद्यार्थ्याला गाईड करतात. तरीही आरोप केला जातो. हे दु:खद आणि क्लेषदायक आहे.' असे डॉक्टर लहाने यांनी सांगितले

त्यांनी पुढे सांगितले की, 'मी 67 वर्षांचा आहे. मी काही नंबर्ससाठी हे सर्व करत नाही. सेवा म्हणून आम्ही हे काम करत आहोत. विद्यार्थ्यांना आम्ही माफ केले आहे. त्यांना आमची गरज असेल तर आम्ही त्याना शिकवू. त्यांच्यावर कारवाईची मागणी नाही. आम्हाला कार्यमुक्त करावं' तात्याराव लहाने यांच्या पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी दिलेला राजीनामा सरकारने मंजूर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com