Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, त्यामुळेच राज्यातील...,

गोपाल मोटघरे

Sharad Pawar Latest News : गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहित होतं, याबाबत अजित पवार यांना विचारा असा गौप्यस्फोट केला होता. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. (Latest Marathi News)

आता शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी एक मोठं विधान केलं आहे. अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. (Maharashtra Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आज चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधी बाबत अप्रत्यक्षरित्या एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?, असा अप्रत्यक्षरित्या टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी पहाटेच्या शपथविधीविषयी मोठं विधान केलं होतं. पहाटेच्या शपथविधीविषयी शरद पवार यांना माहिती होतं. त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं. पण नंतर त्यांनी धोका दिला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध असतो तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं होतं.

दरम्यान, फडणवीसांच्या या दाव्यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार पुन्हा संतापले. मला याबद्दल काहीही बोलायचे नाही, माझा स्वभाव तुम्हाला माहित नाही. मला तो विषय काढायचा नाही, जुनं उकरून काढण्यात अर्थ नाही. मी मनकवडा नाही, पुढे फडणवीस मीटींग ला भेटले की मी त्यांना विचारतो. तुम्ही पुन्हा पुन्हा तेच विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळेल, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Coconut Oil: स्वयंपाकापासून ते सौंदर्य खुलवण्यापर्यंत...; नारळाच्या तेलाचे फायदे ऐकून व्हाल थक्क

SSC Board Result Date: दहावीचा निकाल कधी लागणार?, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितली तारीख

Devendra Fadnvis News | पुणे हिट अँड रन प्रकरणी आरोपीला अटक होणार? गृहमंत्री फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

Pune Car Accident : जामिनाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Srikanth Film Collection : 'श्रीकांत'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, राजकुमार रावच्या अभिनयाचे होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT