Sharad Pawar news  saam tv
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: शरद पवारांनी धमकी मिळाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'धमक्या देऊन...'

Sharad Pawar News: धमकीवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'धमक्या देऊन आवाज कोणाचा बंद करू शकेल, असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे, असे शरद पवार म्हणाले. (Latest Marathi News)

शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शरद पवार यांनी धमकी मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले,'राज्याची कायदा आणि व्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी. कोणत्याही प्रश्नावर मत मांडण्याचा अधिकार या जनतेच्या प्रत्येक नागरिकाला आहे'.

'धमक्या देऊन आवाज कोणाचा बंद करू शकेल असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा हा गैरसमज आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेशी संदर्भात यंत्रणा आहे. पोलीस दलावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे धमकक्याची चिंता मी करत नाही', असे शरद पवार म्हणाले.

'राज्यात ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत. त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत असे सांगितले आहे की, 'ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे. त्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.'

तसेच मुख्यमंत्र्यांनी 'गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत. त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.'

दरम्यान, शरद पवार यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 'तुमचा दाभोलकर करु', अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली. शरद पवार यांना मिळालेल्या धमकीनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणी सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Maharashtra Live News Update: शिवसेनेबरोबर आता रायगड जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी विरोधात तोंड उघडले

Nashik : स्मशानभूमी शेड अभावी मृतदेहाची अवहेलना; अंत्यसंस्कारासाठी घ्यावा लागतोय प्लास्टिक पेपरचा आधार

Vaibhav Suryavanshi : शुभमन गिलमुळे शतक ठोकलं, आता त्याच्यासारखं द्विशतकही करणार, वैभव सूर्यवंशीनं पूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT