Ajit Pawar  Yandex
मुंबई/पुणे

Mahayuti Politics : 'चूक केली तर थेट जेलची हवा, मग चक्की पिसिंग..', 'लाडकी बहीण'वरुन अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana In Raigad Sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे. यामुळे आज ते रत्नागिरी-चिपळूणमध्ये आहेत. रायगडमध्ये त्यांची सभा पार पडली आहे.

Rohini Gudaghe

रूपाली बडवे, साम टीव्ही मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलीय. निवडणुकीनंतर ही योजना बंद पडणार, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. कोणी कोर्टात गेले तर आम्ही सांगू की ही योजना गरिबांसाठी आहे. गरिबांना गरिबीतून बाहेर काढायचं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडमध्ये सभेत बोलताना सांगितलं आहे.

अजित पवारांनी दिला इशारा

या योजनेत एकाही रुपयाचा भ्रष्टाचार करू दिला (Ajit Pawar On Ladki Bahin Yojana) नाही. एकाने बायकोचे २८ फोटो काढून पैसे लुटले. पण आम्ही ते शोधून काढलं. चुकीचं करायचं नाही. चुकीचं केलं की जेलमध्ये जाल. चक्की पिसिंग अॅण्ड पिसिंग असा इशारा त्यांनी दिलाय. या योजनेत चुका दिसल्या तर त्यात बदल करू. आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. ही योजना चालू ठेवायची असेल तर घड्याळाचं बटण दाबा, असं आवाहन त्यांनी सभेत बोलताना केलंय.

योजना बंद पडणार ?

एवढा पैसा महिलांच्या हातात गेला तर त्या काहीतरी खरेदी करणार, म्हणजे हे ४६ हजार कोटी मार्केटमध्ये फिरणार आहेत. दुकानदारांना फायदा होईल. यात वाढ करायची ठरवलं आहे, पण त्यासाठी महायुतीचे सरकार परत आलं (Ajit Pawar News) पाहिजे. हातावर बांधलेल्या राख्यांची शपथ घेऊन सांगतो की, या योजनेत बसणाऱ्या महिलांना काहीच कमी पडू देणार नाही. ही योजना बंद पडणार नसल्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय.

महिलांना सक्षम करण्यासाठी धोरण

३५ वर्षे मी समाजकारण, राजकारण करतोय. मी मागे दहावा अर्थसंकलप सादर (Maharashtra Assembly Election) केला. काम, धूणेभांडी, कचरा गोळा करणारी महिला यांना एवढे कष्ट पडतात. या महिलांना जगण्याचा अधिकार आहे. पण त्या इच्छेला मुरड घालतात. बालकांना आहार देण्याचं काम केलं. आदिती तटकरे यांच्या खात्याच्या माध्यमातून योजना (Mahayuti Politics) आणल्या. आदिती तटकरे यांनी चौथे महिला धोरण आणले. महिलांना सबळ, सक्षम आणि सुरक्षित करायचे आहे. दीड हजार म्हंटल्यावर काही चेष्टा करतात. पण सोन्याचा चमचा घेवून आलेल्या दीड हजारांची किंमत काय कळणार, अशी टीका त्यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT