Mumbai Crime: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एसीबीच्या जाळ्यात Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एसीबीच्या जाळ्यात

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाचे सहसंचालक अनिल जाधव यांना एसीबीने लाच घेताना अटक केली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणाचे सहसंचालक अनिल जाधव (Maharashtra State Skill Development Society Joint Director) यांना एसीबीने (NCB) लाच घेताना अटक केली आहे. यानंतर एनसीबीने त्यांच्या घराची झडती घेतली आहे. झडती घेत असताना कोट्यवधी रुपयांची संपत्ती आढळून आली आहे. अनिल जाधव यांच्या घरामधून कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. अनिल जाधव यांना मंगळवारी ५ लाख रुपयांची लाच घेताना मुंबईतील (Mumbai) वांद्रे येथील कार्यालयातून अटक (Arrested) करण्यात आली होती. (NCB arrest MSSDS joint director accepting bribe)

हे देखील पहा-

यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अनिल जाधव यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरामधून कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीने अनिल जाधव यांच्या घरामधून १ कोटी ६१ लाख २८ हजारांची संपत्ती जप्त करण्यात आहे. यामध्ये ८१ लाख रुपयांची रोकडचा समावेश आहे. तर इतर वस्तूंमध्ये सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटे आणि दागिन्यांच्या समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका शैक्षणिक (Academic) अकॅडमीमध्ये भागीदार आहेत. आपल्या अकॅडमीमध्ये विविध कोर्सच्या मंजुरीकरिता त्यांनी शिक्षण आणि प्रादेशिक विभागाकडे अर्ज केला होता. यावेळी या मंजुरीकरिता अनिल जाधव यांनी त्यांच्याकडे ५ लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर त्या संबंधित इसमाने याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी ही रक्कम देण्याचे ठरले आणि जेव्हा अनिल जाधव हे ५ लाखांची लाच घेत होते. त्यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी एसीबी अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT